Salman Khan: ऐश्वर्याचा गातानाचा जुना व्हिडिओ व्हायरल पण लाजणाऱ्या सलमानवर खिळल्या सगळ्यांच्या नजरा, नेटकरी म्हणतात-

Aishwarya Rai Singing Salman Khan Reaction Viral Video: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रे यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे.
aishwarya rai
aishwarya rai sakal
Updated on

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. अनंत आणि राधिकाच्या लग्नात त्या दोघांनीही वेगवेगळी घेतलेली एंट्री या चर्चांना हवा देणारी ठरली. त्यानंतर सोशल मीडियावर चाहते अभिषेकला आणि बच्चन कुटुंबियांना दोष देताना दिसले. अशातच त्यांनी त्यांचे काही जुने फोटोही शोधून काढले. त्यातलाच एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात ऐश्वर्या गाणं गाताना दिसतेय. मात्र या व्हिडिओमधील सलमानच्या प्रतिक्रियेने सगळ्यांची मनं जिंकली आहेत.

हा व्हिडिओ एका कार्यक्रमातील आहे. यात ऐश्वर्या गाणं गाताना दिसतेय. ती बॉबी देओल याच्या १९९७ साली प्रदर्शित झालेल्या 'और प्यार हो गया' या चित्रपटातील 'मेरी सांसो मै बस है एक नाम' हे गाणं गातेय. तर या कार्यक्रमाला खान कुटुंबियांनी देखील हजेरी लावली आहे. सलमान खान हा मलायका अरोरा आणि भाऊ अरबाज खान यांच्यासोबत प्रेक्षकांमध्ये बसला आहे. जेव्हा ऐश्वर्या गाणं गाते तेव्हा कॅमेरा सलमान खानच्या दिशेने वळतो. ऐश्वर्याला गाताना पाहून तो अगदी भारावलेला दिसतो. सलमान ऐश्वर्याला बघून लाजताना दिसतो. तर त्याच्या मागे बसलेले गृहस्थ त्याच्याकडे ऐश्वर्याच्या गाण्याचं कौतुक करतात. त्यामुळे सलमान आणखीनच लाजतो.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. आता नेटकरी त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने ऐश्वर्याच्या आवाजाचं कौतुक करत लिहिलं, 'हीच आवाज किती गोड आहे.' दुसऱ्याने लिहिलं, 'यार ही किती भारी आहे.' आणखी एकाने लिहिलं, 'हाये ही सुंदर आणि निरागस मुलगी आहे. तिचं गाणं ऐकायला किती छान वाटतंय.' तर अनेक नेटकऱ्यांनी सलमानच्या प्रतिक्रियेचं कौतुक केलं आहे. या आठवणी किती छान आहेत, सलमानचा चेहरा तर बघा. गेले ते दिवस, भाईजान किती लाजतोय, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे.

एकीकडे या व्हिडिओची चर्चा आहे तर दुसरीकडे ऐश्वर्या आणि अभिषेक वेगळे होणार असल्याचं बोललं जातंय. तर सलमानने २४ जुलै रोजी त्याच्या कथित गर्लफ्रेंड युलिया वंतूरचा वाढदिवस त्याच्या घरी साजरा केला आहे. त्यावरूनही चांगलीच चर्चा रंगली आहे.

aishwarya rai
Yed Lagla Premacha: जय दुधाणेने दोन महिन्यात का सोडली 'येड लागलं प्रेमाचं' मालिका? स्वतः सांगितलं कारण, म्हणतो- माझ्यासाठी...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.