सुरज चव्हाणसाठी अजित पवार यांची मोठी घोषणा; बांधून देणार हक्काचं घर; 'या' गोष्टीचीही घेणार काळजी

Ajit Pawar Announced Help To Suraj Chavan: 'बिग बॉस मराठी ५' नंतर सुरज चव्हाणवर कौतुकाचा वर्षाव झालाय. आता थेट महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनीही त्यांच्यासाठी काहीतरी करून देण्याचं ठरवलं आहे.
suraj chavan
suraj chavan esakal
Updated on

लोकप्रिय रीलस्टार सुरज चव्हाण याने 'बिग बॉस मराठी' च्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. त्याने आपल्या साधेपणाने सगळ्यांचं मन जिंकलं. त्याच्यावर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यानंतर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजला मोठी घोषणा केली आहे. अजित दादांनी त्याला मदत करायचं ठरवलं आहे. अजित दादा आता सूरजला थेट २ बीएचके घर बांधून देणार आहेत. गावात नवीन जागा घेऊन त्यावर सुरजला नवीन घर बांधून देणार आहेत.

बिग बॉसच्या विजयानंतर बारामतीच्या सूरज चव्हाणची भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: सूरजला फोन केला होता. पण त्यावेळी सूरजला भेटणं शक्य झालं नाही. पण अखेरीस बिग बॉसची ट्रॉफी घेऊन सूरज चव्हाण अजित दादांच्या भेटीला गेला. या भेटीत अजित दादांनी त्याची आणि त्याच्या बहिणींची देखील चौकशी केली.

शिवाय त्याचं घर लहान आहे, त्याला गावात घर बांधून द्या अशा सूचना यावेळी अजित दादांनी दिल्या. यासोबतच दादांनी आणखी एका गोष्टीची काळजी घेतली आहे. आपण त्याचं अभिनयातील करिअर घडवून देण्यास मदत करू असं दादा म्हणाले आहेत. यासाठी आपण रितेश देशमुखसोबत बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

यापूर्वी रितेशनेदेखील सूरजला मदत करणार असल्याचं सांगितलं होतं. त्याला पैशांच्या व्यवस्थापनाचं ज्ञान नसल्याने आपण त्याची मदत करणार असल्याचं रितेश म्हणाला होता. आता अजित दादादेखील त्याला मदत करणार आहेत. तर 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता झाल्यानंतर केदार शिंदेंनीही त्याला आपल्या चित्रपटात भूमिका दिली आहे. ते त्याला घेऊन 'झापून झुपुक' हा चित्रपट करणार आहेत.

suraj chavan
Mallika Sherawat: माझं लक्ष वेधून घेण्यासाठी सेटवर भांडायचे अनिल कपूर अन् नाना पाटेकर; मल्लिका शेरावतचा दावा अन्...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.