Upcoming Movies: स्वातंत्रदिनी बॉक्स ऑफिसवर भिडणार तीन सिनेमे;अक्षय, राजकुमार, जॉनपैकी तुमची पसंती कोणाला?

Movies Releasing On 15 August: बॉलिवूडमधील तीन बड्या कलाकारांचे तीन मोठे चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहेत.
movies releasing on 15 august
movies releasing on 15 august esakal
Updated on

15 ऑगस्ट हा दिवस सिनेमा रसिकांसाठी सर्वात मोठा फिल्मी वीकेंड ठरणार आहे कारण अक्षय कुमारचा 'खेल खेल में', राजकुमार रावचा 'स्त्री 2' आणि जॉन अब्राहमचा 'वेदा' यांच्यात बॉक्स ऑफिसवर लढत होणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक चित्रपटाचा स्वतःचा वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. अक्षय एक स्टार पॉवर चित्रपट घेऊन येणार आहे तर राजकुमार रावने पॉवरहाऊस म्हणून स्वतःची प्रतिमा प्रस्थापित केली आहे आणि तो त्याच्या प्रेक्षकांची आवडती व्यक्तिरेखा बिकी म्हणून परत येत आहे. बॉक्स ऑफिस वर वेगळीच लढाई अनुभवयाला मिळणार आहे. तर जॉन अब्राहमच्या 'वेदा' ची अनोखी चर्चा असून तो पॉवरहाऊस कामगिरीचा ट्रेडमार्क आहे.

अक्षय कुमारची स्टार पॉवर 'खेल खेल में' ला तारून नेईल का? राजकुमार रावच्या 'स्त्री 2' मूळची जादू पुन्हा चालेल का? की 'वेदा' मधला जॉन अब्राहमचा दमदार अभिनय बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवेल? अक्षय कुमारचे या वर्षी 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि 'सरफिरा' असे दोन रिलीज झाले असताना राजकुमार रावने 'श्रीकांत' आणि 'मिस्टर अँड मिसेस माही' मधील त्याच्या अभिनयाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आणि स्वत:ला सर्वात शक्तीशाली अभिनेता असल्याचे सिद्ध केलं आणि तो 'स्त्री 2' सोबत हॅट्ट्रिक मारण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे जॉन त्याच्या चाहत्यांना 'पठाण' पासून वाट बघायला लावत असताना 'वेदा' साठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

15 ऑगस्ट हा दिवस बॉलिवूड आणि त्याच्या चाहत्यांसाठी रोमांचक असणार आहे. एकाच वेळी तीन बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होत असल्याने सिनेप्रेमींना अनोखी पर्वणी असणार आहे तुम्ही कोणाची वाट पाहत आहात?

movies releasing on 15 august
Shah Rukh Khan: असं कोण वागतं रे! शाहरुखने वयस्कर व्यक्तीसोबत केलेली कृती बघून चाहत्यांना विश्वास बसेना; म्हणतात-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.