Akshaya Deodhar: पाठक बाईंनी चाहत्यांना दिली गुड न्यूज; अक्षया देवधर झाली बिझनेसवूमन; सुरू केला नवा व्यवसाय

Akshaya Deodhar New Business: लोकप्रिय मराठी अभिनेत्री अक्षया देवधर हिने आता चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.
akshaya deodhar
akshaya deodharesakal
Updated on

लोकप्रिय मराठी अक्षय देवधर हिने पाठक बाई बनून प्रेक्षकांची मनं जिंकली. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर घराघरात स्वतःचं स्थान निर्माण केलं. 'तुझ्यात जीव रंगला' मालिका संपून इतकी वर्ष लोटली तरीही अक्षया पाठकबाई म्हणूनच ओळखली जाते. आता प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रीने चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. अक्षया आता बिझनेस वूमन झाली आहे. तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय. अक्षयाने अभिनयासोबतच व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. तिने स्वतःचा साडीचा ब्रँड सुरू केलाय. तिने आणि तिच्या दोन मैत्रिणींनी मिळून हा ब्रँड सुरू केलाय. तिच्या साडीच्या ब्रँडचं नाव 'भरजरी' असून तिने एक पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज दिली आहे.

अक्षयाने सात दिवसांपूर्वी काहीतरी खास असल्याचं सांगत चाहत्यांना इशारा दिला होता. आता तिने याबद्दल खुलासा केला आहे. अक्षयानं एक खास पोस्ट शेअर करत तिच्या नवीन ब्रॅंडबद्दल सांगितलं आहे. अक्षयाने तिच्या मैत्रिणी निधी आणि माधुरीसोबत मिळून हा व्यवसाय सुरू केलाय. तिने पोस्टमध्ये त्यांचा सुंदर असा लोगो दाखवला आहे. तिने पोस्ट करत लिहिलं, 'भरजरी’ - नाम (निधी, अक्षया आणि माधुरी) आम्हा तिघींच हे स्वप्न… प्रत्येकीने आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्यात पाहिलेलं… एकत्र येऊन पूर्ण करत आहोत. तुमच्या साथीने… विश्वासाने आणि प्रेमाने… हे पाऊल पुढे टाकत आहोत. आपल्या ‘भरजरी’ चे नवीन दालन लवकरच सुरू होत आहे. प्रेम कायम असू दे.. आमच्यावर ही आणि आपल्या ‘भरजरी’ वर ही.'

हे दुकान नक्की कुठे आहे हे तिने सांगितलं नसलं तरी ते पुण्यात असल्याचा अंदाज चाहते लावताना दिसतायत. सोबतच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षावही करत आहेत. चाहते तिचं अभिनंदन करताना थकत नाहीयेत. अक्षयाने यापूर्वी पोस्ट करत तिचं दुकानही दाखवलं होतं. अक्षयाच्या कामाबद्दल बोलायचं तर, 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अक्षया या मालिकेनंतर एका शोमध्ये दिसली होती. त्यानंतर मात्र ती फार कुठं दिसली नाही. त्यामुळं पुन्हा एकदा तिला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

akshaya deodhar
माश्यांच्या जाहिरातीवरून माफी ते सासऱ्यांची प्रॉपर्टी हडपण्याचा आरोप, वर्षा उसगावकर अनेकदा अडकल्यात वादाच्या भोवऱ्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.