आजीला पाहून आनंदाने टाळ्या वाजवू लागली आलिया- रणबीरची लेक; पहिल्यांदाच ऐकू आला राहाचा आवाज, एअरपोर्टवरच सुरू झाली मस्ती

Raha Kapoor Talked First Time With Neetu Kapoor On Camera: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची मुलगी राहा हीचा एक व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होतोय.
alia bhatt with raha kapoor
alia bhatt with raha kapoor esakal
Updated on

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांची लेक राहा कपूर हीला पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. तिचा गोड चेहरा पाहून चाहते कायमच तिच्यावर फिदा होतात. राहाचे व्हिडिओही चाहत्यांमध्ये प्रचंड व्हायरल होतात. आता असाच एक व्हिडिओ चाहत्यांमध्ये व्हायरल होतोय ज्यात राहा आलिया आणि रणबीरसोबत एअरपोर्टवर दिसतेय. ज्यात ती आजीला पाहताच खूप आनंदी होताना दिसतेय. ती चक्क आनंदाने टाळ्या वाजवताना दिसतेय. तिचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना पुन्हा एकदा तिची भुरळ पडली आहे. तर या व्हिडिओत तिचा आवाजही ऐकू येतोय.

सोशल मीडियावर रणबीर आणि आलिया यांचा राहासोबतचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. राहा सुरुवातीला शांत आहे. ती पापाराझींना पाहून हातदेखील हलवते. ती आलियाच्या कडेवर आहे. मात्र जशी ती मागून येणाऱ्या नीतू कपूर यांना बघते ती आनंदाने टाळ्या वाजवू लागते. आलिया नीतू यांना पाहून म्हणते, 'काय टायमिंग आहे'. त्यानंतर राहासुद्धा त्यांना पाहून उद्या मारू लागते. ती आपल्या तोतऱ्या आवाजात काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते. तर नीतूही तिच्याकडे पाहून मारण्याचे हातवारे करताना दिसतात. तिचा हा क्युट अंदाज पहिल्यांदाच दिसला आहे. तर तिचा आवाजही चाहत्यांनी पहिल्यांदाच ऐकलं आहे त्यामुळे नेटकरी तिचा विडीओ पाहून खूप खुश आहेत.

यावर नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. एका चाहत्याने लिहिलं, 'मिक्स व्हर्जन ऑफ कपूर फॅमिली.' दुसऱ्याने लिहिलं, 'कुणाची नजर नको लागायला.' एका चाहतीने लिहिलं, 'थोड्या वर्षांनी दीपिकासुद्धा आपल्या मुलीला घेऊन अशीच प्रवास करताना दिसेल.' असं म्हंटल जातंय की आलिया, रणबीर, राहा आणि नीतू कपूर सध्या व्हेकेशनसाठी गेले आहेत. ते कुठे गेले आहेत त्याबद्दल माहिती समोर आलेली नाही.

alia bhatt with raha kapoor
एक नाही तर दोन मुलींचा बाप होता गोविंदा पण एकीचं तिसऱ्या महिन्यातच झालं निधन; पत्नीने सांगितलं मृत्यूचं कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.