दादरच्या सिद्धिविनायक मंदिरातील झेंडूंच्या फुलांपासून बनवलीये आलियाची दिवाळी स्पेशल साडी; किंमत किती तर...

Alia Bhatt Diwali Saree Made From meri Gold Flowers : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या दिवाळी साडीची जोरदार चर्चा झाली. मात्र ती साडी अत्यंत खास आहे.
Alia Bhatt
alia bhattesakal
Updated on

Latest Bollywood News: अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची जोडी चाहत्यांची आवडती आहे. आलियाने नेहमीच आपल्या वागण्याने सगळ्यांसमोर आदर्श घालून दिला आहे. करिअरच्या शिखरावर असताना लग्न आणि आई होणं हे अनेक अभिनेत्रींसाठी प्रेरणादायी ठरलेलं. आलियाने बॉलिवूड कलाकारांचे कपड्यांबद्दलचे विचारही बदलले. अनेक कलाकार हे एकदा घातलेले कपडे पुन्हा घालत नाहीत. मात्र आलियाने सगळं बदलत एकच सगळ्या गोष्टींना नवा टच दिला.

तिने तिच्या लग्नातली साडी ही राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना नेसली. तर हळदी आणि मेहंदीच्या कार्यक्रमातील ड्रेस दिवाळी पार्टीमध्ये घातले. आता आलियाची अशीच एक साडी सोशल मीडियावर चर्चेत आहे. ती साडी म्हणजे तिची दिवाळीला नेसलेली पिवळ्या रंगाची टिशू साडी. दिवाळीला आलियाने गडद पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. अभिनेत्रीच्या प्लेन साडीवर हलकीशी डिझायनर बॉर्डर असल्याचं फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. तिने या साडीवर सोनेरी रंगाचा स्लीव्हलेस ब्लाउज घातला होता. तर, लेक राहा अन् रणबीरने सुद्धा तिला मॅचिंग असे कपडे घातले होते. मात्र या साडीची खासियत काहीतरी वेगळीच आहे. आलियाच्या साडीत झेंडूच्या फुलांचा पुनर्वापर करण्यात आलाय.

काय आहे खास आणि किती आहे साडीची किंमत

आलियाने नेसलेली साडी अमी पटेलने डिझाइन केली आहे. ही अतीव आनंद यांच्या रि-सेरेमोनिअल ब्रँडची साडी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात अर्पण केलेल्या झेंडुच्या फुलांचा पुनर्वापर करून रंगवलेली होती. मंदिरात दररोज जमा होणाऱ्या फुलांचा पुनर्वापर करून पर्यावरणपूरक पद्धतीने या साड्या बनवल्या जातात. हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार अभिनेत्रीच्या साडीची किंमत तब्बल ८२ हजार ५०० रुपये आहे. तिच्या या साडीची अजूनही चाहत्यांमध्ये चर्चा आहे.

Alia Bhatt
नागा चैतन्यशी घटस्फोटानंतर आई होणार सामंथा रूथ प्रभू; म्हणाली- 'वयाचा विचार करून जर मी...'

आलियाच्या कामाबद्दल सांगायचं तर ती 'जिगरा' चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. ती लवकरच 'अल्फा' चित्रपटात दिसणार आहे.

Alia Bhatt
अखेर 'पारू' मालिकेत होणार खऱ्या खलनायिकेची एन्ट्री; 'मन झालं बाजींद' मधील अभिनेत्री साकारणार भूमिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.