Alia-Ranbir: रणबीरच्या वाढदिवसाला आलियाने शेअर केली झक्कास पोस्ट; पहिलाच फोटो पाहून नेटकरी म्हणाले- किती गोड

Alia Bhatt Shared Post For Ranbir Kapoor Birthday : लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट हिने रणबीरच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने त्यांचे फोटो शेअर केले आहेत.
alia bhatt
alia bhattesakal
Updated on

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. तिने आपल्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली. सध्या आलिया तिच्या करिअरसोबतच एक पत्नी आणि आई असण्याचं कर्तव्य देखील उत्तम पद्धतीने पार पाडताना दिसत आहे. आज रणबीर कपूरचा वाढदिवस आहे. हा वाढदिवस साजरा करण्यासाठीच संपूर्ण कपूर कुटुंब काही दिवसांपूर्वी पॅरिसला गेलं होतं. त्यांचा एअरपोर्टवरचा एक व्हिडिओही तेव्हा व्हायरल झाला होता. आता रणबीरच्या वाढदिवसानिमित्त आलियाने एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने त्यांचे पॅरिस व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत.

आलियाने काही फोटो शेअर करत रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टच्या पहिल्याच फोटोमध्ये आलिया, रणबीर आणि चिमुकली राहा एका झाडाला मिठी मारून उभे असलेले दिसत आहेत. या फोटोंमधल्या राहाला पाहून नेटकरी तिच्यावर फिदा झाले आहेत. तर दुसऱ्याच फोटोमध्ये रणबीर सुपरमॅनची टोपी घालून राहिला एका हातात उचलून घेऊन पॅरिसच्या रस्त्यांवर फिरताना दिसतोय. यामध्ये रणबीर आणि छोटीशी राहा घोड्यांच्या तबेल्यात देखील दिसत आहेत. राहा त्या घोडयांना पाहत आहे. तर शेवटच्या फोटोमध्ये हॅपी बर्थडे रणबीर लिहिलेला एक फुगा दाखवला आहे.

ही पोस्ट करत आलियाने लिहिलं, 'कधीकधी तुम्हाला फक्त एक मिठी हवी असते. आणि मग तुम्ही सगळे एकच आहेत हे कळतं. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा प्रिय.' तिची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. चाहते त्यावर लाइक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

alia bhatt
BB Marathi Voting Trends: सुरज टॉपवर पण सगळ्यात कमी मतं कुणाला? शेवटच्या आठवड्यात हे दोन सदस्य डेंजर झोनमध्ये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.