Pushpa 2 OTT Streaming Rights: 'पुष्पा - द राइज' च्या जबरदस्त यशानंतर, प्रेक्षक या चित्रपटाच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत. अल्लू अर्जुनचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'पुष्पा 2' यावर्षी पडद्यावर येणार आहे. 'पुष्पा 2' यावर्षी 6 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'अल्लू अर्जुनसोबत या चित्रपटात रश्मीका मंदानादेखील झळकणार आहे. मात्र या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधींची कमाई केली आहे. चित्रपटाचे ओटीटी हक्क त्याच्या प्रदर्शनापूर्वी विकले गेले आहेत. यामध्ये चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच निम्म्या बजेटची कमाई केली आहे. वाचा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मने घेतलेत 'पुष्पा २' चे राइट्स.
'पुष्पा'ने प्रेक्षकांना वेड लावलं. त्यामुळेच चाहते पुन्हा एकदा आपल्या लाडक्या पुष्पराजला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. ६ डिसेंबररोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असला तरी 'पुष्पा 2' चे OTT अधिकार डिजिटल प्लॅटफॉर्म Netflix ने आधीच खरेदी केले आहेत. चित्रपटाचे निर्माते आणि नेटफ्लिक्समध्ये कोट्यवधींचा करार झाला आहे. आकाशवाणीने दिलेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुनच्या या बहुप्रतिक्षित सिक्वेल चित्रपटासाठी नेटफ्लिक्सने निर्मात्यांना 270 कोटी रुपये दिले आहेत. अशाप्रकारे 'पुष्पा 2' डिजिटल अधिकारांच्या बाबतीत सर्वात महागड्या भारतीय चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. यासोबतच या चित्रपटाने बजेटच्या अर्धी कमाई आधीच केली आहे.
अल्लू अर्जुन याच्या 'पुष्पा २'चं बजेट ५०० कोटी आहे. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' OTT वर विकला जाणारा चौथा सर्वात महागडा भारतीय चित्रपट ठरला आहे. याआधी 'KGF Chapter- 2' तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याचे हक्क प्राइम व्हिडिओने 320 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रभासचा चित्रपट दोन OTT प्लॅटफॉर्म Netflix (175 कोटी) आणि प्राइम व्हिडिओ (200 कोटी) यांनी 375 कोटी रुपयांना संयुक्तपणे विकत घेतला. पहिल्या क्रमांकावर 'RRR' आहे ज्याचे हक्क Netflix, Zee5 आणि Hotstar ने 385 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.