Pushpa 2 Release Date: आता फक्त दिवस मोजा! 'पुष्पा २'ची रिलीज डेट जाहीर; 'या' दिवशी थिएटरमध्ये येणार पुष्पराज

Pushpa 2 Release Date Announcement: लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन याच्या 'पुष्पा २'ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता त्याची रिलीज डेट जाहीर झाली आहे.
pushpa 2 release date
pushpa 2 release dateesakal
Updated on

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन याच्या 'पुष्पा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्याच्या 'पुष्पा'ने सगळ्यांची मनं जिंकली. कोट्यवधींची कमाई करणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड तोडले. त्यानंतर प्रेक्षकांना या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता लागून राहिली होती. हा चित्रपट कधी येणार याकडे प्रेक्षक डोळे लावून बसले होते. मात्र आता ही प्रतीक्षा संपली आहे. 'पुष्पा २' ची रिलीज डेट अखेर जाहीर झाली आहे. निर्मात्यांनी 'पुष्पा- द रूल' (Pushpa 2 The Rule) चित्रपटाचं शानदर पोस्टर प्रदर्शित केलं असून यासोबत चित्रपटच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे.

आजपासून बरोबर १०० दिवस

'पुष्पा द रुलर' ला मिळालेल्या प्रतिसादानंतर निर्मात्यांनी 'पुष्पा द रुल'ची' प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं होतं. मात्र चित्रपटाचं पोस्ट प्रोडक्शन बाकी असल्याने निर्मात्यांनी प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. गाण्याचं एडिटिंग पूर्ण न झाल्याने 'अंगारो सा' हे गाणंही फक्त लिरिकल प्रदर्शित करण्यात आलं. मात्र आता निर्मात्यांनी नव्या पोस्टरसोबत या चित्रपटाची तारीख जाहीर केली आहे. 'पुष्पा- द रूल' च्या नव्या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन आपल्या आयकॉनिक पुष्पा राज अवतारात दाखवण्यात आला आहे. 'पुष्पा- द रूल' च्या नव्या पोस्टरवर एक टॅगलाईन देण्यात आली आहे. 'फक्त १०० दिवस बाकी'.

काय आहे सिनेमाची रिलीज डेट?

रिलीज झालेल्या पोस्टरनुसार #Pushpa2TheRule हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 मध्ये देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 'पुष्पा- द रूल' या चित्रपटात अल्लू अर्जुन हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिक्वलमध्ये पुष्पा आणखी आक्रमक रुपात दिसणार आहे. याशिवाय रश्मिका मंदाना पुन्हा एकदा आपला जलवा दाखवणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.