लोकप्रिय भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि मॉडेल नताशा स्टेंकोव्हिक यांनी महिन्याभरापूर्वीच आपल्या घटस्फोटाची बातमी देत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा झाली. नताशाने यापूर्वी अली गोनी याला डेट केलं होतं. ते जवळपास ५ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. मात्र त्यानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आता अभिनेता अली गोनीची एक मुलाखत व्हायरल होतेय ज्यात तो त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल बोलताना दिसतोय. नेटकरी आता या व्हिडिओचा संबंध नताशासोबत जोडताना दिसतायत.
अलीने नुकतीच भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टला भेट दिली. या पॉडकास्टमध्ये अली हा त्याच्या रिलेशनशिपबद्दल बोलताना दिसतोय. या पॉडकास्टमध्ये अली म्हणतो की त्याची गर्लफ्रेंड त्याला त्याच्या आईवडिलांपासून दूर जायला सांगत होती. अली मुलाखतीत म्हणतो, 'जे माझं यापूर्वीच रिलेशनशिप होतं ते खूप सिरीयस होतं. ते तुटलं त्याचं कारणच हे होतं की तिने मला सांगितलं की 'यार करू तेव्हा भविष्यात आपण वेगळे राहू. तुझ्या आई-वडिलांसोबत राहायचं नाही. ही गोष्ट मला खटकली. हे मला जमणार नव्हतं. मी एक फॅमिली मॅन आहे. मी माझ्या कुटुंबापासून दूर नाही राहू शकत. मी जिथे जाईन माझ्या कुटुंबासोबतच राहीन. मी माझ्या कुटुंबाला नाही सोडू शकत मग कुठलीही मोठी ताकद आली तरी.'
या मुलाखतीत अलीने नताशाचं नाव घेतलं नसलं तरी चाहते त्यांचा संबंध नताशाशी जोडत आहेत. अली आणि नताशा एकत्र 'नच बलिये' मध्ये दिसले होते. आता अली गोनी अभिनेत्री जास्मिन भसीनला डेट करत आहेत. तर नताशा आता तिच्या मुलासोबत तिच्या मायदेशी परत गेली आहे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.