मराठीतला फक्त एक शब्द चुकला अन् बिग बींनी मागितली प्रेक्षकांची माफी; नेटकरी काय म्हणाले माहितीये?

Amitabh Bachchan Apologised For Making Mistake In Marathi Word Kachara : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मराठीचा एक शब्द चुकल्यामुळे प्रेक्षकांची माफी मागितली आहे.
amitabh bachchan
amitabh bachchan esakal
Updated on

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेली कित्येक दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यांनी ८० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलं. 'कुली, 'डॉन', 'जंजीर' अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केलं. त्यानंतर त्यांनी वयाच्या उत्तरार्धातही अशा काही भूमिका केल्या ज्या करताना इतर कलाकारांनी हजारदा विचार केला असता. वयाच्या ९० तही त्यांची क्रेज मुळीच कमी झालेली नाही. आजही ते चाहत्यांचे आवडते आहेत. मात्र यशाच्या शिखरावर असूनही त्यांचे पाय कायम जमिनीवर राहिले. ते आजही सगळ्यांशी नम्रपणे बोलतात. आता पुन्हा एकदा त्यांच्या याच स्वभावाची प्रचिती आली आहे. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यात ते चाहत्यांची माफी मागतायत.

अमिताभ हे आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांच्या सारखा अभिनेता बनणं हे अनेकांचं स्वप्न आहे. पण त्यासाठी अंगी नम्रता असणं फार गरजेचं आहे. नुकताच बिग बींनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी चुकीचं मराठी बोलल्याबद्दल माफी मागितली आहे. काही दिवसांपूर्वी बिग बींनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्यांनी "मी कचरा करणार नाही" असं म्हणत चाहत्यांनाही कचरा न करण्याचं आवाहन केलं होतं. पण, हा व्हिडिओ करताना मराठी बोलण्यात बिग बींकडून चूक झाली होती. गायक सुदेश भोसले यांनी सांगितल्यानंतर बिग बींच्या ही चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनी व्हिडिओ शेअर करत चुकीचं मराठी बोलल्याबद्दल माफी मागितली आहे. तसंच या व्हिडिओत त्यांनी त्यांची चूकही सुधारली आहे.

हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिलं, 'एका व्हिडिओत उच्चार चुकला होता. त्यामुळे परत हा व्हिडिओ करत आहे. क्षमा असावी'. बिग बींनी शेअर केलेला हा व्हिडिओ पाहून चाहते त्यांचं कौतुक करत आहेत. नेटकऱ्यांनीही त्यांना प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओवर उत्तर देत नेटकऱ्यांनी लिहिलं, 'कदाचित यामुळेच तुम्ही आम्हाला खूप आवडता', तुम्ही कमाल आहात सर', 'तुम्ही खूप भारी आहात', 'तुम्ही किती योग्य आणि वक्तशीर व्यक्ती आहात तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे.' अनेकांनी व्हिडिओवर हर्टचे ईमोजी दिले आहेत.

amitabh bachchan
...म्हणून केदार शिंदेंनी बदलला 'बिग बॉस मराठी ५'चा होस्ट; कोहली-रोहितचं उदाहरण देत म्हणाले- महेशदादाबद्दल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.