भर रस्त्यात मला लोक शिव्या देत होते आणि माझे आईवडील... अमिताभ बच्चन यांनी सांगितला २५ वर्षांपूर्वीचा तो वाईट प्रसंग

Amitabh Bachchan Talked About His Tough Days: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनाही एकेकाळी लोकांच्या रागाचा सामना करावा लागला होता. त्यांनी एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे
amitabh bachchan
amitabh bachchan esakal
Updated on

अमिताभ बच्चन यांनी नुकताच त्यांचा ८२ वा वाढदिवस साजरा केला. 60 च्या दशकापासून फिल्म इंडस्ट्रीचा एक भाग असलेले अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आणि पुरस्कारही जिंकले. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात त्यांनी खूप चढ-उतार पाहिले. पण ९० च्या दशकात एक वेळ अशी आली जेव्हा अमिताभ बच्चन यांचे चित्रपट सतत फ्लॉप होत होते. त्यांच्या करिअरचा ग्राफ सातत्याने खाली जात होता. त्यानंतर अमिताभ यांनी करिअरमधून ब्रेक घेऊन व्यवसाय सुरू केला. पण तेव्हा लोकांनी त्यांना खूप शिवीगाळ केली होती, याचा खुलासा बिग बींनी एका मुलाखतीत केला होता.

अमिताभ बच्चन यांनी 1999 मध्ये वीर संघवीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, जेव्हा ते आई तेजी बच्चन आणि वडील हरिवंशराय बच्चन यांच्यासोबत कारमध्ये बसले होते, तेव्हा लोकांनी त्यांना रस्त्यात घेरून शिवीगाळ केली होती. अमिताभ म्हणाले होते, 'लोक रस्त्यावर एकत्र आले. ते कारच्या खिडकीतून डोकावून माझ्या वाईट अभिनयाबद्दल मला शिवीगाळ करायचे. तुम्हाला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. तुमच्या मागे तुमचे आईवडील गाडीत बसलेले असतात तेव्हा तर आणखीनच वाईट वाटतं .

अमिताभ मुंबई सोडणार होते

याच मुलाखतीत अमिताभ यांनी सांगितलं की, जेव्हा ते त्यांच्या करिअरमध्ये संघर्ष करत होते, तेव्हा त्यांना मुंबई सोडण्यास सांगण्यात आलं होतं. त्यांना कुणीही काम देत नव्हतं. अमिताभ यांनी सांगितलं की, त्यांच्यासोबत असं अनेकवेळा घडलं की, जेव्हा ते रस्त्यावर कुठेतरी थांबायचे तेव्हा लोक त्यांना मुंबई सोडून जायला सांगायचे. त्यानंतर अमिताभ यांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला होता. या शहराला आता आपली गरज नाही असं त्यांना वाटलं होतं.

कारकीर्द पुन्हा रुळावर आली

पण 'कौन बनेगा करोडपती'ने अमिताभ बच्चन यांचं करिअर आणि आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. यानंतर अमिताभ यांनी त्यांचं करोडोंचं कर्ज फेडलं. अमिताभ यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, कठीण काळात त्यांनी यश चोप्रांची मदत घेतली. त्यानंतर यश चोप्रांनी अमिताभ यांना 'मोहब्बतें' ऑफर केला. यामुळे त्याच्या आयुष्याची दिशाच बदलली. अमिताभ यांची अभिनय कारकीर्द पुन्हा रुळावर आली.

amitabh bachchan
सावत्र आईबद्दल पहिल्यांदाच बोलले अमिताभ बच्चन; लग्नाच्या काही वर्षात झालेलं निधन, म्हणाले- त्यांच्या मृत्यूनंतर बाबूजी...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.