Amruta Khanvilkar: राग व्यक्त करुन कुणाचं दु:ख नाही कमी करु शकणार... लैंगिक अत्याचार प्रकरणावर थेट बोलली अमृता खानविलकर

Amruta Khanvilkar on Rape Case: मराठीसह हिंदीतही लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री अमृता खानविलकरही दलापुर लैंगिक अत्याचार प्रकरणावर व्यक्त झालीय.
amruta khanvilkar
amruta khanvilkaresakal
Updated on

कोलकाता मधील डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जातोय. सोशळ मिडीयाच्या माध्यातून राग आणि प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. तर यातच नुकतच घडलेलं बदलापुर लैंगिक अत्याचार प्रकरणावरही प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. मनोरंजन विश्वातील कलाकार मोठ्या संख्येने या दोन्ही प्रकरणावर व्यक्त होताना दिसत आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारही सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांचं मत मांडत राग व्यक्त करत आहेत.

मराठीसह हिंदीतही लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री अमृता खानविलकरही या प्रकरणावर व्यक्त झालीय. सकाळ समुहाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अमृताला या प्रकरणावर प्रश्न विचारला असता अमृताने तिचं मत मांडलय. अमृताला न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचं यावेळी तिने सांगितलं. अमृता म्हणते की, "मला एक अभिनेत्री आणि सोशल फिगर म्हणून एवढच वाटतं की, आपली सरकार असेल किंवा पोलिस असतील.. ती कोलकाता केस सीबीआयकडे गेलीय.. काय होतय की सगळे राग व्यक्त करतायतत, पण तो विश्वास नाही दाखवत आहेत.

'मी अशी व्यक्ती जी विश्वासाने परिपूर्ण आहे. ज्या ज्या कामासाठी लोकं आपणच नेमली आहेत त्यांच्यावरती आपण विश्वास ठेवायला पाहिजे. मला माहिती आहे की एका रात्रीत काहीच होत नाही, अपघात घडतात आणि घटना घडतात. जेव्हा आपल्याला एखाद्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तर तो न्याय यायला वेळ लागतो. त्यामुळे तो विश्वास डगमगता कामा नये, नाहीतर मग देश कोसळतो असं मला वाटतं.'

यावर अमृता पुढे म्हणते की, "माझं त्या संपूर्ण न्यायव्यवस्थेवर आणि सरकारवर पूर्ण विश्वास आहे. मी आता यावर बोलून किंवा राग व्यक्त करुन कुणाचं दु:ख नाही कमी करु शकणार. प्रत्येकाची दु:ख हाताळण्याची पद्धत वेगळी असते. थोडा विश्वास आणि संयम ठेवा सगळं लवकरच आपल्या समोर असेल."

अमृतासह अनेक कलाकारांनी त्यांची मतं मांडली आहेत. कुणाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे तर कुणी न्यायाची मागणी करतय.अशी विविध मतं आणि प्रतिक्रिया आता समोर येऊ लागल्या आहेत. मात्र या दोन्ही प्रकरणात लवकरात लवकर न्याय मिळण्याची मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरु लागलीय.

amruta khanvilkar
तो काय मोठा स्टार... पैसे न मिळाल्याच्या अर्शद वारसीच्या तक्रारीवर भडकले बोनी कपूर, म्हणाले- आता काय त्याला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.