मराठी सोबतच हिंदी चित्रपटांमध्येही आपली छाप पाडणारी अभिनेत्री अमृता कुलकर्णी हिने चंद्रा बनून प्रेक्षकांची मनं जिंकली. तिला 'चंद्रमुखी' या चित्रपटातून खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. तिने तिच्या नृत्यानेही प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मात्र आता अमृता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अमृताने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यात ती महायुतीच्या योजनेची जाहिरात करताना दिसतेय. महायुतीच्या लाडकी बहीण योजना या योजनेची सध्या सगळीकडे चर्चा आहे. याच योजनेची ती जाहिरात करतेय. जाहिरात करणं चुकीचं नाही मात्र ती जाहिरात करण्याची पद्धत मात्र चुकली आहे असं अनेक नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
अमृताने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मैत्रीण अमृतासाठी कैरीचं लोणचं घेऊन येते. अमृताला कैरीचं लोणचं खूप आवडत असल्याने तिलाही आनंद होतो. तेव्हा ती मैत्रीण अमृताला सांगते की, हे लोणचं तिच्या मैत्रिणीने बनवलं असून ‘लाडकी बहीण योजने’चे पैसे मिळाल्यानंतर तिने हा व्यवसाय सुरु केला आहे. त्यावर अमृता म्हणते की, 'माझ्या आवडत्या लोणच्यामागे अशी प्रेरणादायी गोष्ट असेल, हे मला माहीतच नव्हतं. खरंच, हे सरकार म्हणजे ना लोकांचं आयुष्य बदलून टाकत आहे बघ…'
या जाहिरातीवर नेटकऱ्यांनी एकाहून एक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिलं, 'आंब्याचा सीझन कधी होता आणि लाडकी बहीण योजना कधी आली? ऑगस्ट मध्ये लागतात का आंबे?' आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, 'आधी फॉलोवर्सना जुगार विकला आता हे पण करताय.' दुसऱ्याने लिहिलं, 'चंद्रमुखी नंतरचा हा दमदार परफॉर्मन्स आहे.' आणखी एकाने लिहिलं, 'विश्वास बसत नाही तुमच्यासारखी अभिनेत्री यात पडत आहे! हे फुकटचे पैसे आपले आहेत, त्यांच्या खिशातले नाहीत आणि याचा तू प्रचार करत आहेस हे चूक आहे.' अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.