Anant Radhika Wedding Return Gift: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट १२ जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आपल्या धाकट्या लेकाच्या लग्नात कोणतीही कमी ठेऊ इच्छित नाही. या लग्नात अंबानींनी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. या लग्नाच्या आधीचे कार्यक्रम तीन दिवसांपूर्वीच सुरू झाला आहे. तर लग्नानंतरही दोन दिवस त्यांचे कार्यक्रम सुरू राहणार आहेत. हळद, गरबा नाईट, शिव शक्ती पूजा असे अनेक कार्यक्रम पार पडले आहेत. या लग्नासाठी अनेक बड्या कलाकारांना आणि व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यांच्यासाठी आणि या लग्नासाठी अंबानींनी नेमकी काय तयारी केली आहे ते पाहा.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणार आहे. 'दैनिक भास्कर'च्या वृत्तानुसार, देश आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत समाविष्ट असलेले मुकेश अंबानी यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लग्नासाठी आमंत्रित केले आहे. एवढेच नाही तर परदेशातूनही अनेक व्हीव्हीआयपी पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. लग्नाच्या सर्व जबाबदाऱ्या डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड सांभाळणार आहेत. व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी जेट तयार ठेवण्यात आले आहेत.
मुकेश अंबानी यांचे संपूर्ण कुटुंब झेड प्लस सुरक्षेत असेल. आयएसओएस (इंटिग्रेटेड सिक्युरिटी ऑपरेटिंग सिस्टीम) सेटअप देखील स्थापित करण्यात आली आहे. बीकेसीमध्ये 10 एनएसजी कमांडो आणि पोलीस अधिकारी, 200 आंतरराष्ट्रीय सुरक्षा रक्षक, 300 सुरक्षा सदस्य आणि 100 हून अधिक वाहतूक आणि मुंबई पोलीस कर्मचारी यांचा समावेश असलेलं सुरक्षा दल तैनात असेल.
वधू आणि वर फ्लॅश मॉबमध्ये प्रवेश करतील, मनीष मल्होत्राने डिझाइन केलेले पोशाख
अनंत आणि राधिका फ्लॅश मॉबसोबत लग्नात उतरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कोरिओग्राफर वैभवी मर्चंटच्या देखरेखीखाली ६० डान्सर्ससोबत तो परफॉर्म करणार आहे. त्याच वेळी, रिलायन्स फाऊंडेशनच्या 'स्वदेश' च्या कारागिरांच्या सहकार्याने मनीष मल्होत्रा यांनी लग्नाचे सर्व पोशाख डिझाइन केले आहेत.
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नाच्या मेन्यूबद्दल सांगायचं तर, यात हजाराहून अधिक पदार्थांचा समावेश असेल. असं सांगितलं जात आहे की 10 हून अधिक आंतरराष्ट्रीय शेफ हे पदार्थ तयार करतील. एवढेच नाही तर व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी खास रिटर्न गिफ्ट्स म्हणून घड्याळ तयार करण्यात आले असून ही घड्याळं करोडो रुपयांची आहेत. या परतीच्या भेटवस्तू अनेक राज्यांतून बनवून आणल्या आहेत. घड्याळ फक्त व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी असेल. तर इतर पाहुण्यांसाठी राजकोट, काश्मीर आणि बनारसमधून खास रिटर्न गिफ्ट्स तयार करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.