Video: अनंतच्या वरातीत निक जोनासला अनन्या पांडेने मारला धक्का; पाहताच रणवीर सिंगने सांभाळली परिस्थिती, नेटकरी म्हणाले- ही मुलगी...

Ananya Panday At Anant Radhika Wedding: राधिका आणि अनंत अंबानी यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. आता त्यांच्या लग्नातील एक व्हिडिओ चर्चेत आहे.
ananya panday
ananya panday sakal
Updated on

मुकेश अंबानी आणि राधिका मर्चंट १२ जुलै रोजी लग्नबंधनात अडकले. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे हा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाहासाठी अनेक दिग्गज नेते, बडे व्यावसायिक, हॉलिवूड आणि बॉलिवूडचे कलाकार उपस्थित होते, या लग्नाची चर्चा संपूर्ण देशभरात आहे. त्यातही गाजली ती अनंतची वरात. अनंतच्या वरातीत अनेक बॉलिवूड कलाकार दिलखुलास पद्धतीने नाचले. एकमेकांचा मान ठेवत, अदबीने एकमेकांना भेटले. या वरातीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र यातील एका व्हिडिओत नेटकऱ्यांनी अनन्या पांडेची ती कृती निदर्शनास आणून दिली आहे. ती चक्क निक जोनासला धक्का मारून पुढे येताना दिसतेय.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास खास अनंतच्या लग्नासाठी भारतात आले होते. त्याच्या वरातीत प्रियांका अभिनेता रणवीर सिंगसोबत नाचताना दिसली. ते दोघेही सपने मे मिलती हैं या गाण्यावर डान्स करताना दिसले. त्या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र याच व्हिडिओमधील एक गोष्ट नेटकऱ्यांच्या नजरेतून सुटली नाहीये. या व्हिडिओत अनन्या पांडे प्रियांकाच्या शेजारी उभ्या असणाऱ्या निक जोनासला धक्का मारून नाचण्यासाठी पुढे येताना दिसतेय. तर तिच्या वागण्यामुळे गोंधळलेला निक अचंबित होऊन तिच्याकडे पाहताना दिसतोय. तो मागे सरकतो. मात्र ही परिस्थिती सांभाळ्यासाठी रणवीर सिंग पुढे येतो.

रणवीर मागे गेलेल्या निकला पुन्हा हात देतो आणि पुढे आणतो. त्यानंतर तो त्याला गाण्यावर नाचण्यासाठीही सांगतो. एकूणच रणवीर ही परिस्थिती उत्तमरीत्या हाताळताना दिसतोय. या सगळ्या प्रकारानंतर नेटकरी अनन्यावर नाराज आहेत. हे काही आपल्या घरचं लग्न नाहीये, ते आपले पाहुणे आहेत, निक जोनासच्या लोकप्रियतेपुढे अनन्याला कुणीही विचारणार नाही, तिचं हे वागणं चुकीचं आहे, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

ananya panday
Anant Radhika Wedding: समोर अमिताभ बच्चन आले अन् शाहरुखने... अनंत- राधिकाच्या लग्नात किंग खानच्या 'त्या' कृतीने जिंकली मनं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com