अनंत-राधिकाच्या लग्नात येण्यासाठी कलाकारांना पैसे दिले गेले? अनन्या पांडेने सांगितलं सत्य, म्हणते-

Ananya Panday Talked On Anant Radhika Wedding : अभिनेत्री अनन्या पांडे हीने अनंत राधिकाच्या लग्नात कलाकारांना येण्यासाठी पैसे दिले होते का या प्रश्नावर उत्तर दिलं आहे.
ananya panday
ananya pandayesakal
Updated on

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला दोन महिने उलटले आहेत. यानंतरही त्यांची चर्चा काही संपत नाही. या लग्नाला देशातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली होती. लग्नात अनेक सिनेस्टार्स दिसले. यानंतर या स्टार्सना पैसे देऊन बोलावण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. आता अभिनेत्री अनन्या पांडे हिने यावर आपले मौन सोडले असून तिचा अनुभवही शेअर केला आहे. अनन्याने अनंत आणि राधिकाच्या नात्याबद्दलही तिने सांगितले. अनंत आणि राधिका हे तिचे मित्र असल्यामुळे तिने या हाय-प्रोफाइल लग्नाला हजेरी लावली. बॉलीवूड सेलिब्रिटींना लग्नासाठी पैसे दिले जात असल्याच्या अफवाही तिने फेटाळून लावल्या.

अनन्याला अनंतच्या लग्नाच्या वरातीत तिच्या डान्सबद्दल विचारण्यात आले. याबद्दल बोलताना तिने शेअर केले, ‘‘ते माझे मित्र आहेत. लोकांना असे का वाटते ते मला समजत नाही. आम्हाला लग्नात येण्यासाठी कोणतेही पैसे देण्यात आलेले नवहते. अर्थात माझ्या मित्रांच्या लग्नात मी मनापासून नाचणार. मला प्रेम आणि आनंद साजरे करायला आवडते.’’ अभिनेत्रीने अनंत आणि राधिकाच्या नात्याचे ‘शुद्ध प्रेम’ असे वर्णन केले आणि त्यांच्यातील खोल बंधाबद्दल उत्साहाने सांगितले. ती म्हणाली, ‘‘लग्नातून एक मोठा धडा मिळाला की खूप काही घडत होतं; पण जेव्हा अनंत आणि राधिकाने एकमेकांना पाहिले तेव्हा फक्त निखळ प्रेम दिसत होतं. मला माझ्या आयुष्यात असाच जोडीदार हवा आहे.’'

अनंत राधिकाने तीनवेळा प्री वेडिंग करून मग मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे लग्नगाठ बांधली होती. यात अनेक कलाकारांनी या लग्नाला हजेरी लावली होती. तर कलाकार लग्नात नाचलेही होते.

ananya panday
याला म्हणतात संस्कार! अवॉर्ड फंक्शनमध्ये आराध्याचं वागणं पाहून सगळेच झाले चकीत; ऐश्वर्याचं कौतुक करत म्हणाले...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.