अनिल कपूर आणि नाना पाटेकर हे दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. बॉलिवूडमध्ये अशी मैत्री पाहायला मिळणं म्हणजे दुर्मिळ गोष्ट आहे. त्या दोघांनी 'परिंदा' आणि 'वेलकम' चित्रपटात एकत्र काम केलं. तेव्हापासूनच त्यांची मैत्री अगदी घट्ट आहे. मात्र नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनिल यांनी नानांना त्यांची इमेज बदलण्याचा सल्ला दिला. तुझ्या रागीट स्वभावामुळे तुझ्यासोबत कुणी काम करायला तयार होत नाही असं अनिल म्हणाले. नेमकं काय घडलं?