'या' बॉलिवूड अभिनेत्याने नाकारली पानमसाल्याची जाहिरात; होती कोट्यवधींची ऑफर; म्हणाला- कितीही पैसे दिलेत तरी...

Actor Rejected Paan Masala Advertisement: अनेक बॉलिवूड कलाकारांवर टीका झाल्यानंतर लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याने आता पानमसाल्याची जाहिरात नाकारली आहे.
anil kapoor
anil kapoor esakal
Updated on

बॉलिवूडमधील अनेक बडे अभिनेते अनेकदा पण मसाल्याची जाहिरात करताना दिसतात. या जाहिरातींमुळे समजावर काय परिणाम होतोय याची जाणीव असूनही हे कलाकार पान मसालाचे ब्रँड मोठे करताना दिसतात. यात शाहरुख खान, अक्षय कुमार, अजय देवगन, टायगर श्रॉफ यांचा समावेश आहे. या कलाकारांवर टीकाही करण्यात आली. अक्षय आणि अजय यांनाही प्रचंड ट्रोल करण्यात आलं त्यानंतर या कलाकारांनी पान मसाल्याच्या जाहिराती न करण्याचा निर्णय घेतला. नुकतीच अभिनेता आर माधवन याने त्याला विचारणा करण्यात आलेली पान मसाल्याची जाहिरात नाकारली होती. आता आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याने कौतुकास्पद निर्णय घेत पान मसालाच्या जाहिरातीला नकार दिला आहे. त्याने कोटींची ऑफर नाकारली आहे.

हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून अनिल कपूर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अनिल यांनी एका मोठ्या कंपनीला पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी नकार दिलाय. आपली सामाजिक जबाबदारी आणि प्रेक्षकांप्रती कर्तव्य लक्षात घेऊन त्यांनी ही जाहिरातीची ऑफर नाकारली. कितीही पैसे मिळत असले तरी लोकांच्या आरोग्याला धोका होणार असेल अशा कोणत्याही प्रोडक्टचा मी प्रचार करणार नाही असं ते म्हणाले. वयाच्या ६७ व्या वर्षीही एकदम फिट असणाऱ्या अनिल कपूर यांनी आपल्या फिटनेसने अनेकांना प्रेरणा दिली आहे.

त्यामुळे आरोग्यासाठी हानिकारक गोष्टींच्या जाहिराती आपण करणार नाही हे त्यांनी आधीच ठरवलं होतं. फक्त अनिल कपूरचं नाही तर रजनीकांत, कमल हसन यांसारखे दाक्षिणात्य अभिनेतेही कधीही अशा जाहिराती करत नाहीत. अनिल कपूर शेवटचे 'फायटर', 'सावी' आणि 'ऍनिमल' या चित्रपटात दिसले होते. आता प्रेक्षक त्यांच्या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहेत.

anil kapoor
दिलीप कुमार यांनी गमावलेलं त्यांचं आठ महिन्याचं बाळ; म्हणालेले- सगळा दोष सायराला दिला गेला पण...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.