सुरज आता तो सुरज राहिला नाही... बारामतीमध्ये अंकिता वालावलकरला आला वाईट अनुभव, म्हणाली- त्याचं वागणं पाहून...

Ankita Prabhu Walawalkar Talked On Suraj Chavan: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' मधील स्पर्धक अंकिता वालावलकर हिने आता सुरजच्या बदललेल्या वागण्याबद्दल सांगितलं आहे.
Ankita Walawalkar
ankita prabhu walawalkar esakal
Updated on

Latest Entertainment News: 'बिग बॉस मराठी ५' मधून घराघरात पोहोचलेले स्पर्धक अंकिता वालावलकर, सुरज चव्हाण यांची सोशल मीडियावर अजूनही चर्चा आहे. सुरज बिग बॉस जिंकल्यानंतर त्याच्या फॉलोवर्समध्ये लाखोंची वाढ झाली. मात्र गावाला गेल्यानंतर त्याच्या वागणुकीत खूप फरक पडला असल्याचं अंकिताने सांगितलंय. अंकिता काही दिवसांपूर्वी आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत बारामतीला सूरजला भेटायला गेली होती. मात्र मोढवे गावी गेल्यानंतर तिला वेगळाच अनुभव आला. आपण येणार असल्याचं माहीत असूनही सुरज घरी नव्हता. इतकंच नाही तर आपण आलोय हे सांगूनही तो घरी परत आला नाही असं अंकिताने तिच्या ब्लॉगमध्ये म्हटलंय.

अंकिताने तिच्या 'कोकण हार्टेड गर्ल' या युट्युब चॅनेलवर सुरजच्या गावी काय घडलं हे सांगितलंय. ती म्हणाली, 'आम्ही सूरजच्या घरी पोहोचलो. त्याच्या बहिणीने आमचं छान स्वागत केलं. पण आम्ही पोहोचल्यानंतर सूरज एक तासानंतर आम्हाला भेटला. आम्ही तुझ्या गावात पोहोचलो आहे हे सांगूनही तो पोहायला गेला होता. घरी पोहोचल्याचं सांगितल्यावर तो अंघोळीला गेला. खरंतर त्याला आम्ही आधीच कल्पना दिली होती की आम्ही पोहोचलाय. तो तासाभराने घरी आला आणि आम्हाला न भेटताच आत गेला. मी बिग बॉसमध्ये ज्या सूरज चव्हाणला भेटले तो हा सूरज नाहीए. त्याला इथे जसं सांगितलं जातंय तसं तो वागतोय म्हणूनच मी हे सगळं इथे सांगत आहे. आपल्या घरी माणूस येणार हे माहीत असल्यावर आपण किमान घरी थांबतो पण त्याने तेवढीही तसदी घेतली नाही.'

सुरजच्या या वागणुकीवर नेटकरीही आता शंका व्यक्त करत आहेत. अंकिता सूरजला भेटायला गेली तेव्हाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केले होते मात्र दोन दिवसातच त्याच्या अकाउंटवरून हे व्हिडिओ गायब झाले. त्यावर नेटकऱ्यांनी अंकिताला प्रश्न विचारले होते. हे सगळं सुरजच्या मागे कुणीतरी करतंय असं अंकिता म्हणाली. आता माझ्याकडून काही अपेक्षा करू नका. काही लोकांना मी त्याच्या आयुष्यात नकोय म्हणून हे सगळं सुरू आहे, असंही ती म्हणाली. त्यानंतर सुरजने इंस्टाग्रामवर माफी मागितली होती. सूरज चव्हाण लवकरच 'झापूक झुपूक' सिनेमात दिसणार आहे. केदार शिंदे त्याच्यासाठी सिनेमा बनवत आहेत.

Ankita Walawalkar
'टाइम प्लीज' चित्रपटात होती 'सुख म्हणजे...' मधील गिरिजा प्रभू; प्रिया- उमेशसोबत केलंय काम, तुम्ही ओळखलंत का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.