सध्या छोट्या पडद्यावर सर्वाधिक चर्चेत असलेला कार्यक्रम म्हणजे 'बिग बॉस मराठी ५'( Bigg Boss Marathi). या कार्यक्रमाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. या सीझनमध्ये घडत असलेल्या गोष्टी थोड्या हटके असल्याने सगळेच आता कार्यक्रमात जास्त गुंतले आहेत. सर्वसामान्य प्रेक्षकांपासून कलाकारांपर्यंत सगळेच यावर कमेंट करत आहेत. घरातल्या अनेक गोष्टी प्रेक्षकांना खटकतात. त्यातील एक गोष्ट म्हणजे अभिनेत्री निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांची जवळीक. त्यांच्यातील नातं खरं की खोटं हेच प्रेक्षकांना समजत नाहीये. अरबाज आधीच एका रिलेशनशिपमध्ये असताना आता तो निक्कीसोबत असा का वागत आहे असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. त्यातच आता त्याच्या गर्लफ्रेंडने केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरतेय.
बिग बॉसच्या घरात झालेल्या एका टास्कदरम्यान अरबाजला तो कमिटेड आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळेस त्याने हो असं म्हटलं होतं. मात्र त्यानंतर त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल एकच चर्चा रंगली. तर तो निक्कीसोबत प्रेमाचं नाटक करत असल्याचंही बोललं गेलं. आता त्याच्या गर्लफ्रेंडने केलेली एक पोस्ट चर्चेत आहे. अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडचे नाव लीझा बिंद्रा (Leeza Bindra) आहे. लीझा सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. तिचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. आता लीझाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने अरबाजचं नाव लिहीत फॉलोअर्सना एक विनंती केली आहे. लीझाने स्वतःचा एक सेल्फी पोस्ट केला आहे, त्यावर तिने लिहिलं 'प्लीज मला अरबाजबद्दल मेसेज किंवा कमेंट करू नका'.
लिझाच्या या पोस्टमुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्याचं घरातील वागणं पाहून आणि निक्कीसोबतची जवळीक पाहून तिने त्याच्याशी संबंध तोडले असल्याचं बोललं जातंय. लीझा व अरबाज पटेल बऱ्याच काळपासून सोबत आहेत. ते एकमेकांबरोबरचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असतात. मात्र आता त्याच्यात बिनसलं असल्याचं बोललं जातंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.