Armaan Malik Rape Case : लोकप्रिय युट्यूबर अरमान मलिक याने आपल्या दोन पत्नींसह 'बिग बॉस ओटीटी ३' मध्ये एंट्री केली होती. त्याला या घरात पाहून नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका करायला सुरुवात केली. ती टीका त्याच्या दोन लग्नाच्या समर्थनाच्या विरोधात होती. मात्र त्यानंतर लोकांसमोर अरमानचं आणखी एक सत्य आलं आणि ज्यामुळे सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. अरमानवर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा आरोप आहे. तो यासंदर्भात न्यायालयीन लढाई लढत आहे. असं असताना अरमानला बिग बॉस मध्ये कसं काय घेण्यात आलं असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच अरमानने त्यावर उत्तर दिलं आहे.
बिग बॉसच्या घरातून सगळ्यात आधी त्याची पहिली पत्नी पायल मलिक बाहेर पडली. त्यानंतर तो स्वतः बाहेर आला आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीने कृतिकाने टॉप ५ मध्ये जागा मिळवली. आरमानवर अल्पवयीन मुलीवर बालकर केल्याचा आरोप आहे. या तक्रारीची कॉपी देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता घरातून बाहेर आल्यावर त्याने याबद्दल भाष्य केलं आहे. अरमानने नुकतीच एबीपीला मुलाखत दिली. याबद्दल बोलताना अरमान म्हणाला, 'मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. हे प्रकरण अजून कोर्टात आहे. त्यामुळे या प्रकरणात मला कोणतीही कमेंट करायची नाही. न्यायालयाचा निर्णय येताच सगळ्यांना कळेल की काय होणार, नक्की काय झालं होतं आणि काय सुरु आहे.'
आता बिग बॉसमधून बाहेर आल्यावर काय करणार असा प्रश्न विचारल्यावर आपण पुन्हा ब्लॉग सुरू करणार असं तो म्हणाला. अनेकदा बिग बॉसविषयी प्रश्न उपस्थित करण्यात येतात की हा शो स्क्रिप्टेड आहे का तर त्यावर अरमाननं उत्तर दिलं की 'मला स्वत: ला वाटायचं की बिग बॉस हे स्क्रिप्टेड आहे आणि तिथे जाणून माझे डोळे उघडले. जर कोणी म्हणालं की हा शो स्क्रिप्टेड आहे तर मला त्या व्यक्तीला नक्कीच भेटायचं आहे.' बिग बॉसचा ग्रँड फिनाले २ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यापूर्वी कृतिकादेखील घराबाहेर झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.