तो काय मोठा स्टार... पैसे न मिळाल्याच्या अर्शद वारसीच्या तक्रारीवर भडकले बोनी कपूर, म्हणाले- आता काय त्याला

Boney Kapoor Back Answere To Arshad Warsi Statement: अर्शद वारसीने त्याला 'रूप की रानी चोरो का राजा' साठी पूर्ण पैसे मिळाले नव्हते असं सांगितलं होतं. त्यावर आता बोनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
arshad warsi
arshad warsiesakal
Updated on

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता प्रभासबद्दल व्यक्तव्य केलं होतं. 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटात प्रभास जोकर दिसत होता असं तो म्हणाला होता. त्यावरून सोशल मीडियावर एकाच गोंधळ सुरू झाला. काहींनी त्यांना योग्य म्हटलं तर काहींनी ट्रोल केलं. याच मुलाखतीत अर्शदने प्रोड्युसर बोनी कपूर यांनी त्याला त्याच्या कामाचे पूर्ण पैसे दिले नाहीत असं सांगितलं होतं. आता त्यावर बोनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बोनी त्याच्यावर चांगलेच संतापले आहेत.

काय म्हणलेला अर्शद?

ही गोष्ट १९९३ मध्ये आलेल्या 'रूप की राणी चोरोका राजा ' या चित्रपटादरम्यानचा आहे. या चित्रपटातील एक गाणं अर्शदने कोरिओग्राफ केलं होतं. प्रोडक्शनने त्याला लवकरात लवकर हे गाणं पूर्ण करायला सांगितलं होतं. चार दिवसात हे गाणं पूर्ण करणं गरजेचं होतं. अर्शदने मेहनतीने हे गाणं तीन दिवसात पूर्ण केलं. जेव्हा पैसे द्यायची वेळ आली तेव्हा अर्शदला तीन दिवसाचे ७५ हजार रुपयेच दिले गेले. मात्र बोलणं १ लाख रुपये देण्याचा झालं होतं. जेव्हा अर्शद प्रोडक्शन हाउसकडे गेला तेव्हा त्याला सांगितलं की तीन दिवसाचे ७५ हजार रुपयेच मिळणार.

बोनी कपूर यांची प्रतिक्रिया

याबद्दल जेव्हा बोनी यांना विचारलं गेलं तेव्हा ते हसले आणि म्हणाले, 'मी त्याचं म्हणणं वाचलं. १९९२ मध्ये ते शूट झालेलं. आणि तो आता हे सांगतोय. तेव्हा तो काही मोठा स्टार नव्हता. त्याला इतके पैसे कुणी दिले असते? तेव्हा गाण्याचे डायरेक्टर पंकज पराशर होते. गाणं चार दिवसात शूट होणार होतं ते तीन दिवसात झालं. मग एका दिवसाच्या अनुसार त्याला ७५ हजार मिळाले. आम्ही एकत्र एक टीव्ही शो केला होता. तो मला तेव्हा विचारू शकत होता. तेव्हा तर तो काहीच बोलला नाही. आता अचानक तो याबद्दल बोलतोय. सध्या सगळ्यांना मीडियाचं अटेन्शन हवं आहे.'

रूप की राणी चोरो का राजा' हा चित्रपट १० कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. मात्र तो बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला. या चित्रपटाने केवळ ३ कोटींची कमाई केली होती.

arshad warsi
जस्टिन बीबर बाबा झाला; गायकाच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन; पोस्ट करत नावही सांगितलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.