National Doctors Day 2024: अन् अभिनेते अशोक सराफ यांनी केलं डॉक्टरांच्या कामाचं कौतुक; म्हणतात- प्रत्येक गोष्ट

Ashok Saraf On Doctors: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
ashok saraf
ashok sarafsakal
Updated on

अष्टपैलू अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनी त्यांच्या सिनकारकिर्दीत अनेक भूमिका साकारल्या आहेत. चित्रपट, नाटक, मालिका अशा विविध माध्यमांमधून अशोक मामांनी एक वेगळी छाप सोडलीय. आजही अशोक मामा सातत्याने वैविध्यपूर्ण कामातून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. आगमी चित्रपटातून अशोक मामा पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेत झळकणार आहेत.

आगामी 'लाईफलाईन' या चित्रपट अशोक सराफ यांची मुख्य भूमिका पाहायला मिळेल. जुने रीतिरिवाज आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील संघर्षावर आधारित 'लाईफलाईन' हा चित्रपट आहे. नुकतच या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आलाय. या चित्रपटातून अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर या दिग्गजांमधील संघर्षमय जुगलबंदी पाहायला मिळेल. या चित्रपटात अशोक सराफ एका प्रख्यात डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहेत.

lifeline
lifelinesakal

डॉक्टरांच्या परिश्रमाचे कौतुक

अशोक सराफ यांना या भूमिकेत पाहणं महत्त्वपूर्ण ठरेल. त्यामुळे राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधत मुंबईत साजऱ्या करण्यात आलेल्या डॉक्टर्स डे सेलीब्रेशन या कार्यक्रमात अशोक सराफ यांच्या ‘लाईफलाईन’ चित्रपटातील व्यक्तिरेखेच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यावेळी देशातील अनेक नामवंत डॉक्टर्स उपस्थित होते. अशोक सराफ यांनी यावेळी उपस्थित डॉक्टरांशी संवाद साधला. या डॉक्टरांमध्येही अशोक सराफ यांचा चाहतावर्ग असल्याचं यावेळी पाहायला मिळालं. यावेळी अशोक सराफ यांनी डॉक्टरांच्या परिश्रमाचे कौतुक केले.

आपल्या भूमिकेबद्दल आणि राष्ट्रीय डॅाक्टर दिनाबद्दल अभिनेते अशोक सराफ यावेळी म्हणतात की, "आज या प्रख्यात डॉक्टरांसोबत हा दिवस साजरा करता आला, हे मी माझे सौभाग्य मानतो. माझ्या आगामी चित्रपटामुळे मला हा क्षण अनुभवता आला. ‘लाईफलाईन’ या चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा या खास दिनानिमित्ताने समोर आली असून मी यात एका डॅाक्टरची व्यक्तिरेखा साकारत आहे. मुळात या क्षेत्राबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे आणि या चित्रपटामुळे हा आदर अधिकच वाढला आहे.

ashok saraf
ashok sarafsakal

ही भूमिका साकारताना मला डॅाक्टरांची मेहनत, रुग्णांप्रती असलेली आत्मियता, त्यांना करावा लागणारा विविध गोष्टींचा सामना, विरोध या सगळ्या गोष्टी मला या व्यक्तिरेखेमुळे अनुभवता आल्या. प्रत्येक गोष्टीमागे काही विज्ञान असते, हे रीतिरिवाजांमध्ये गुरफ़टलेल्यांना पटवून देणे किती जिकिरीचे काम आहे, हे मला या चित्रपटातून समजले. या चित्रपटात अशोक सराफ यांच्यासह माधव अभ्यंकर, हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.

साहिल शिरवईकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलय. राजेश शिरवईकर यांनीच कथा, पटकथा, संवाद आणि गीतही लिहीले आहेत. या चित्रपटातील गाणी अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केली असून या भावपूर्ण गाण्यांना अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांचा आवाज लाभला आहे. ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी ठरलेला हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

ashok saraf
'नागराज मंजुळेंना नकार दिला नसता तर...' मराठमोळ्या अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली- तेव्हा पर्याय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.