Astad Kale: माझा काहीही संबंध... आस्ताद काळेने सोडलं 'कलावंत पथक'; कारण काय? अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Aastad Kale Update: लोकप्रिय अभिनेता आस्ताद काळे याने कलावंत ढोलताशा पथक सोडलं आहे. आता तो या पथकाचा सदस्य नसणार आहे.
aastad kale
aastad kale sakal
Updated on

गणेशोत्सव म्हटलं की डोळ्यासमोर येतात त्या मोठमोठ्याल्या मुर्त्या, मिरवणुका आणि ढोलताशा पथक. गणपती बाप्पाच्या मिरवणुकांमध्ये विशेष शोभा असते ती ढोलताशा पथकांची. मुंबई आणि पुण्यात तर ढोलताशा पथकांना विशेष मागणी असते. तर पुण्यातील मानाच्या गणपतीसाठी खास ढोलताशा पथक मागवण्यात येतं. पथक पाहण्यासाठी विशेष गर्दी होते. असंच एक पथक प्रेक्षकांच्या ओळखीचं आहे ते म्हणजे कलावंत ढोलताशा पथक. हे पथक प्रेक्षकांच्या आकर्षणाची गोष्ट ठरतं कारण यात मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार सहभागी होतात. महत्वाचं म्हणजे कलाकारांनीच या पथकाची स्थापना केली आहे. मात्र आता अभिनेता आस्ताद काळे याने या पथकाकडे पाठ फिरवली आहे.

२०१४ साली अभिनेता सौरभ गोखले, अनुजा साठे, आस्ताद काळे, श्रुती मराठे या कलाकारांनी कलावंत ढोलताशा पथकाची स्थापना केली होती. यात अभिनेता सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, अभिज्ञा भावे असे अनेक कलाकार या पथकात ढोल वाजवताना दिसतात. त्यातील कलाकारांचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होतात. आस्ताद देखील गेली काही वर्ष या पथकाशी जोडलेला होता. मात्र आता या पथकातून तो बाहेर पडला आहे. त्याने आपल्या या निर्णयामागचं कारण सांगितलेलं नाही मात्र त्याने एक पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

आस्तादने फेसबुकवर एक पोस्ट करत लिहिलं, 'नमस्कार. मी "कलावंत पथक" सोडलं आहे. या पथकाशी, त्याच्या मिरवणुकांशी, वादनांशी माझा काहीही संबंध नाही. तेव्हा नवीन सभासद नोंदणी, तालमींचं वेळापत्रक, मिरवणुका इ. संबंधी मला संपर्क करू नये.' त्याच्या या पोस्टमधून नाराजीचा सूर दिसत आहे. मात्र त्याने याचं नेमकं कारण सांगितलेलं नाही. त्यामुळे त्याने हे पथक का सोडलं असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. आस्ताद सध्या 'मास्टर माईंड' या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यापूर्वी तो शिवराज अष्टकातील अनेक चित्रपटात दिसला आहे.

aastad kale
Bigg Boss Marathi 3: महेश मांजरेकरांसोबत होणाऱ्या तुलनेवर रितेश देशमुख स्पष्टच म्हणाला- मी काही असं ठरवून...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.