सध्या सोशल मीडियावर एकच विषय गाजतोय तो म्हणजे 'बिग बॉस मराठी ५'. या आठवड्यात घरात अशा काही गोष्टी घडल्या ज्या पाहून प्रेक्षकही चक्रावले. घनश्याम दरोडे बाहेर गेल्यानंतर घरात संग्रामची एंट्री झाली. त्यानंतर घरातील समीकरणं बदलणार असं वाटत असतानाच एका टास्कदरम्यान आर्याने निक्की तांबोळीच्या कानशिलात लगावली. त्यामुळे घरात भलताच ड्रामा झाला. अखेर भाऊच्या धक्क्यावर आर्याला बिग बॉसने घराबाहेर जायला सांगितलं. आता आर्या घराबाहेर झाल्याने प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बहुतेक प्रेक्षकांना बिग बॉसचा निर्णय पटलेला नाही. त्यामुळे आता बिग बॉसवर प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत.
कालच्या भाऊच्या धक्क्यावर बिग बॉसनी आर्याला घराबाहेर जाण्याची आज्ञा दिली आणि दुसरीकडे प्रेक्षकांच्या रागाचा भडका उडाला. आता प्रेक्षक यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. आम्ही आजपासून बिग बॉस बघणार नाही असं अनेक प्रेक्षकांनी म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, 'निक्कीने केलेला सगळं माफ आणि आर्याची एक चूक म्हणून तिला थेट घराबाहेर काढलं? आम्हाला हे पटलेलं नाही. बिग बॉसचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. टास्कमध्ये अरबाजही खूप अग्रेसिव्ह होऊन खेळतो. त्याला कुणी काहीच का बोलत नाही? की त्यांच्या सगळ्या चुका माफ करायच्या?' दुसऱ्या युझरने लिहिलं, 'निक्कीला पण बाहेर काढा नाही तर आजपासून आम्ही बिग बॉस बघणार नाही.'
एकाने लिहिलं, 'आजपासून बिग बॉस मराठीवर सामूहिक बहिष्कार. कुणी पाहूच नका. अतिशय घाण करून टाकला हा सीझन. निक्कीमुळे सगळ्याची वाट लागली. आणि शिक्षा दुसऱ्याच कुणालातरी मिळतेय. हे योग्य नाही.' आणखी एकाने लिहिली, 'उद्यापासून बिग बॉस बघणं बंद. बिग बॉस पण निक्कीच्या पायाखालचं पायपुसणं झालाय.' दुसऱ्याने लिहिलं, 'प्रेक्षकांचा शो आहे म्हणे. मग प्रेक्षकांनी तर सांगितलं नाही तिला बाहेर काढायला. की वैभवला वाचवण्यासाठी हे सगळं सुरू आहे' अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी बिग बॉसवर राग व्यक्त केलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.