Sushant Singh Drug Case: सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियन आरोपीची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका

Sushant Singh Rajput Drug Case Update: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर अटक करण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियन आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
sushant singh rajput
sushant singh rajput esakal
Updated on

Sushant Singh Rajput Drug Case Accused: लोकप्रिय अभिनेता सुशांतसिंह राजूपत याच्या मृत्यूने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली होती. २०२० साली सुशांत त्याच्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला होता. मात्र त्याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली होती असा आरोप करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी अधिक शोध घेत काही व्यक्तींना अटक केली होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात आला होता. त्यात एका ऑस्ट्रेलियन आर्किटेक्टला अटक करण्यात आली होती. मात्र आता कोर्टाकडून त्याची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. कोणतेही पुरावे न आढळल्याने कोर्टाने त्याची निर्दोष सुटका केली आहे.

एनसीबीने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली ऑस्ट्रेलियन आर्किटेक्ट पॉल बार्टेल्स याला अटक केली होती. तो एक ड्रग्स विक्रेता असल्याचा आरोप त्याच्यावर होता. तर याप्रकरणी अटक केलेल्या इतर दोघांनी बार्टेल्सचं नाव घेतलं होतं. मात्र हा आरोप सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. कोणतेही ठोस पुरावे नसताना केवळ रेकॉर्ड केलेल्या सामग्रीवरून आणि सहआरोपींच्या जबानीवरून त्याला आरोपी ठरवू शकत नाही असं विशेष नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कोर्टाने म्हंटलं. त्यामुळे त्याची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

यासंबंधित निकाल देताना एनडीपीएस कायद्याच्या कलम 67 अंतर्गत आरोपीने दिलेले आणि नोंदवलेले विधान हे एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्ह्याच्या खटल्यात कबुली जबाब म्हणून वापरले जाऊ शकत नाही असं न्यायाधीश म्हणाले. ते पुढे म्हणाले की जेव्हा तपास पथकाने घराची झडती घेतली तेव्हा कोणत्याही प्रतिबंधित पदार्थाची जप्ती करण्यात आली नाही. त्यामुळे तो आरोपी असल्याचं सिद्ध होत नाही. त्यामुळे बार्टेल्स याची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

sushant singh rajput
Rinku Rajguru: रिंकू राजगुरू आजोळी का जात नाही? अभिनेत्रीने सांगितलं मोठं कारण, म्हणाली- माझ्या आईचे बाबा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.