'अवंतिका', 'सोनपरी' ते 'राजमाता जिजाऊ' बनून ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं त्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. आपल्या अभिनयासोबतच आपल्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या मृणाल यांनी सोनपरी बनून चिमुकल्यांच्या जगातही स्थान मिळवलं. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये काम केलं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांचा दिग्दर्शनाचा प्रवास सांगितला. त्यानिमित्ताने त्यांनी लग्न म्हणजे नेमकं काय याचीही व्याख्या सांगितली.
मृणाल यांनी नुकतीच कॉकटेल स्टुडिओजला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्या म्हणाल्या, 'मी दिग्दर्शन करताना 'प्रेम म्हणजे प्रेम असतं'ची कहाणी लिहिली. त्याला कारण ठरलं माझ्या बाबांनी सांगितलेलं एक संस्कृत सुभाषित. ते म्हणाले, लग्न म्हणजे काय असतं गं? मुलींच्या मनामध्ये तो मुलगा दिसतो कसा याबद्दल सगळ्यात जास्त महत्व असतं. आई म्हणते दिसणं वगरे ठीक आहे पण कमावतो किती? वडील म्हणतात त्याची ख्याती काय आहे, त्याला काही व्यसनं वगरे नाहीत ना. चार चौघात काय बोलतात त्याच्याबद्दल ते आधी बघा.'
पुढे त्या म्हणाल्या, 'नातेवाईक विचारतात की कुठला आहे मुलगा, कुणाचा कोण आणि बाकीचे सगळे जे जातात ते चला चला अक्षता टाका लवकर, जेवायला काय आहे बघा. नको नको हे चांगलं नाहीये बाहेर जाऊया. तिने कोणती साडी नेसलीये, तुम्ही काय आहेर केलात? आपल्यासाठी लग्न म्हणजे हे असतं. पण लग्न म्हणजे खरं काय असतं. त्या दोन माणसांचं आयुष्य, त्यांचे लढे, त्यांच्या अडचणी, त्यांचं एकमेकांबरोबरचं सहजीवन, जे कधीकधी पटकन फुलतं, कधीकधी फुलायला फार वेळ लागतो, कधी ते फुलत नाही, कधी त्याला कीड लागते.'
मृणाल पुढे म्हणाल्या, 'लग्न म्हणजे खरं तर त्या दोघांचा संबंध असतो त्याच्याशी. पण आपण मात्र त्याला एक वेगळंच रूप देतो आणि आपल्यापुरता तो एक फटाका असतो त्या दिवशी वाजवायचा कोट्यवधी रुपये खर्च करायचे. हल्लीची लग्न बघून तर असं वाटतं की हे काय आहे, हे कसं जमलंय आणि हे कसं टिकणार आहे. हाच विचार करताना मी 'प्रेम म्हणजे प्रेम असतं'ची कहाणी लिहिली.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.