अविनाश नारकर यांच्या सासऱ्यांना पाहिलंत का? शेअर केली खास पोस्ट, म्हणतात- माझं अख्खं आयुष्य...

Avinash Narkar Post For Father In Law: अभिनेते अविनाश नारकर यांनी त्यांच्या सासऱ्यांसाठी खास पोस्ट लिहिली आहे.
avinash narkar
avinash narkar esakal
Updated on

९०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री अविनाश नारकर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली. त्यांच्या देखण्या रूपाचे अनेक चाहते होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटात काम केलं. सध्या ते अनेक मालिकांमध्येही काम करताना दिसतात. अभिनयासोबतच ते त्यांच्या रिल्समुळेही सोशल मीडियावर चर्चेत असतात. वयाची पन्नाशी उलटूनही अविनाश त्यांच्या एनर्जीसाठी ओळखले जातायत. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर ही जोडी संपूर्ण सिनेसृष्टीमधे लोकप्रिय आहे. मात्र तुम्ही कधी अविनाश यांच्या सासऱ्यांना म्हणजे ऐश्वर्या यांच्या बाबांना पाहिलंय का? अविनाश यांनी त्यांच्या सासऱ्यांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

अविनाश यांनी त्यांच्या सासऱ्यांसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमागे ‘विठू माऊली तू माऊली जगाची’ हे गाणं ऐकू येत आहे. ते दोघेही या फोटोत हसताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत अविनाश यांनी सासऱ्यांचं कौतुक केलं आहे. तुमचे उपकार मी सात जन्मातही फेडू शकणार नाही असं ते म्हणाले आहेत. अविनाश यांनी पोस्ट करत लिहिलं, 'ज्यांनी माझं अख्खं आयुष्य…माझं संपूर्ण जगणं सर्वार्थाने ऐश्वर्यसंपन्न केलं त्या या माझ्या सासरेबुवांचे…निर्मळ मनाच्या बाबांचे उपकार खरंच साता जन्मात फेडू शकणार नाही मी…' त्यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अविनाश हे काही महिन्यांपूर्वी 'कन्यादान' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसले होते. ही मालिका सन मराठीवर प्रसारित होत होती. तर महिन्याभरापूर्वी त्यांचा 'डंका हरिनामाचा' हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. आता लवकरच ते एका मराठी वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहेत. ‘देवाक काळजी २’ असं या वेब सीरिजचं नाव असून उद्या याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

avinash narkar
त्याच्या आसपास असणाऱ्यांनी ... मायकल जॅक्सनसोबत शेवटच्या दिवसात काय घडलेलं? बॉडीगार्डने सांगितलं सत्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.