Kash Mai Ladka Hoti: स्वातंत्र्यदिनाच्या अगदीच चार दिवस आधी कोलकातामध्ये घडलेल्या एका घटनेने संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघालं. स्वातंत्र्याला ७८ वर्ष होऊनही या देशात स्त्रिया अजूनही सुरक्षित नाहीत ही भावना आजही सगळ्यांच्या मनात आहे. कोलकातामध्ये एका ट्रेनी डॉक्टरवर अमानुषपणे लैंगिक अत्याचार करून, तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली. कामाच्या ठिकाणीदेखील स्त्रिया सुरक्षित नाहीत मग स्त्रियांनी जायचं तरी कुठे, त्यांना मोकळेपणाने जगण्याचा अधिकार नाही का असे अनेक प्रश्न पुन्हा उपस्थित करण्यात आले. बॉलिवूडमधूनही या घटनेवर नाराजी व्यक्त करण्यात आली. अशातच आता अभिनेता आयुष्मान खुराना याने या घटनेवर शेअर केलेली कविता व्हायरल होते आहेत.
आयुष्मानने या घटनेवर एक कविता सादर केली ज्यात त्याने सध्याच्या मुलींच्या मनातील स्थिती मांडली आहे. आम्ही मुली म्हणून जन्माला न येत मुलगा म्हणून जन्माला आलो असतो तर कदाचित आम्ही तुमच्यासारखे सुरक्षित राहिलो असतो असं त्याने या कवितेत म्हटलं आहे. 'काश मैं भी लडका होती... असं या कवितेचं नाव आहे.
तो व्हिडिओमध्ये म्हणतो, मी मुलगा असते तर
मी पण कडी न लावता झोपले असते, माझी इच्छा आहे की मी पण मुलगा असते.
मी पक्ष्यासारखी धावले असते आणि रात्रभर मित्रांसोबत हिंडले असते
माझी इच्छा आहे की मी पण मुलगा असते.
मुलीला शिक्षित करा आणि तिला सक्षम बनवा असे म्हणताना मी प्रत्येकाला ऐकले आहे.
आणि आता मी शिकून डॉक्टर झाली तेव्हा हे असं काही घडलं, माझ्या आईच्या डोळ्यातली आशा गेली नसती
माझी इच्छा आहे की मी पण मुलगा असते.
36 तासांची मेहनत होती, बहिष्कार होता, बलात्कार झाला होता, पुरुषांच्या क्रूरतेशी सामना झाला होता.
पण त्या पुरुषांमध्येही काही स्त्रीलिंगी कोमलता असती तर
माझी इच्छा आहे की मी पण मुलगा असते
सीसीटीव्ही नव्हते, असं सांगितलं जातं, ते असते तरी काय झालं असतं
तिच्यावर लक्ष ठेवणाऱ्या पुरुष सुरक्षा रक्षकाची नजर किती चांगली असेल?
जर मी मुलगा असते
मी जर मुलगा असते तर कदाचित आज मीही जिवंत असते.
आयुष्मानची ही कविता ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं, अनेकांना ही कविता पटली. या नराधमांना पकडून कठोर शिक्षा देण्याची मागणी सध्या होत आहे. कोलकातामधील अनेक डॉक्टर सध्या संपावर गेले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.