मुलाच्या निधनाचा धक्का अन् डॉ. लागूंनी मागितली नाटकातल्या कलाकारांची माफी; वंदना गुप्तेंनी सांगितलं नेमकं काय घडलेलं

Vandana Gupte Talked About Shriram Lagoo : लोकप्रिय अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी श्रीराम लागू यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे जेव्हा त्यांनी सगळ्यांची माफी मागितली.
shriram lagoo
shriram lagoo
Updated on

मराठी अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर कित्येकवर्ष रंगभूमी गाजवली. त्यांनी चित्रपटसृष्टीवरही एकहाती राज्य केलं. त्यांच्या अभिनयाचे सगळेच चाहते होते. त्यांच्या दिसण्यावर तर कित्येक जणी फिदा होत्या. त्यांचा 'पिंजरा' हा चित्रपट प्रचंड गाजला. अनेक दिग्दर्शक त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उभे असायचे. अभिनेत्री वंदना गुप्ते यांनीही श्रीराम लागू यांच्यासोबत काम केलं. त्यांनी 'सुंदर मी होणार' या नाटकात एकत्र काम केलं होतं. मात्र हे नाटक सुरू असतानाच लागू यांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर लागू यांनी नाटक सुरू असतानाच सगळ्या कलाकारांची माफी मागितली होती. असं नेमकं काय घडलं होतं. वंदना गुप्ते यांनी हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला आहे.

वंदना यांनी नुकतीच आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्या म्हणाल्या, 'सुंदर मी होणार या नाटकात डॉ. लागू काम करत होते. त्यांच्या मुलाचा अचानक मृत्यू झाला. त्यानंतरचा जो प्रयोग होता त्यांनी दहा दिवसांनी केलेला. ते ऐन प्रयोगात थोडेसे ब्लॅक झाले. थोडेसे म्हणजे ६ सेकंड जरी ती स्टेजवर अशी गेली सायलंटमध्ये तरी तो खूप मोठा ब्लॅक स्पॉट होतो. आणि सगळ्यांना कळत होतं काय झालंय. बाहेर प्रेक्षकांना लक्षात आलेलं काय झालंय. आणि अरे... असं झालेलं ते की आपल्या मुलाविषयीच बोलतायत ते आणि नंतर मग कसे सावरले त्यातून.'

वंदना पुढे म्हणाल्या, 'पण नंतर आम्हाला सगळ्यांना त्यांनी असं उभं केलं. नाटकाच्या इंटरव्हलला आणि त्यांनी साष्टांग नमस्कार घातला आम्हाला. म्हणजे मी सुमुखी, प्रशांत, कविता केळकर ही सगळी माणसं आणि माझ्या हातून की आज माझ्याहातून अक्षम्य गुन्हा गुन्हा घडलाय मित्रांनो की मी नाटकाच्या बाहेर कशाचा तरी विचार केला. आणि मी ब्लॅक झालो. मला माफ करा, आम्हाला असं झालं की... हा धडाच होता ना एक मोठा.' श्रीराम लागू यांच्या तरुण मुलाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. चालत्या ट्रेनमध्ये बाहेरून भिरकावलेला दगड त्याच्या डोक्याला लागला होता आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.

shriram lagoo
Manwat Murders : "ते हत्याकांड आमच्या गावाजवळच घडले"; मकरंद अनासपुरे यांनी सांगितली ती आठवण , "उत्तमरावची भूमिका..."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.