Krishan Kumar Daughter Death: 'अच्छा सिला दिया' फेम अभिनेत्याच्या मुलीचं अवघ्या २०व्या वर्षी निधन; देत होती कॅन्सरशी झुंज

Krishan Kumar Daughter Tishaa Kumar Death: लोकप्रिय अभिनेते कृष्ण कुमार यांच्या मुलीचं निधन झालं आहे. तिच्या निधनाने अभिनेत्याला मोठा धक्का बसला आहे.
krishan kumar daughter death
krishan kumar daughter deathesakal
Updated on

अभिनेते आणि टी- सीरीजचे को ओनर कृष्ण कुमार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मुलीचं अवघ्या २०व्या वर्षी निधन झालं आहे. कृष्ण कुमार यांची मुलगी तीशा कुमार हिने कमी वयात जगाचा निरोप घेतला आहे. ती गेले अनेक महिने आजारी होती. तीशा कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा सामना करत होती. मात्र अखेर ती तिच्या जीवनाची लढाई हरली आणि तिचं निधन झालं. आपल्या मुलीच्या निधनाने कृष्ण कुमार कोलमडून गेले आहेत.

टी सीरिजचे मालक सध्या मोठ्या दुःखाचा सामना करत आहेत. आपल्या पोटच्या मुलीचा मृत्यू पचवणं त्यांच्यासाठी अशक्यप्राय गोष्ट बनली आहे. तिशाचा जन्म ६ सप्टेंबर २००३ रोजी झाला होता. २० वर्षीय तीशाला कर्करोग झाला होता. तिच्यावर अनेक महिन्यांपासून उपचार सुरू होते. कृष्ण कुमार यांनी तिला वाचवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न केले होते. तिच्यावर जर्मनीतील इस्पितळात उपचार सुरू होते. मात्र अखेर तीशा ही लढाई हरली आणि तिचा जर्मनीतील इस्पितळातच मृत्यू झाला.

टी सीरिजच्या प्रवक्त्यांकडून एक पोस्ट करत ही माहिती देण्यात आली आहे. त्यांनी एक स्टेटमेंट जाहीर केलं आहे. यात लिहिलंय, 'कृष्ण कुमार यांची मुलगी तीशा कुमार हिचं मोठ्या आजारपणानंतर काल निधन झालं. ही तिच्या कुटुंबासाठी खूप कठीण वेळ आहे. आम्ही विनंती करतो की या कठीण काळात कुटुंबियांच्या प्रायव्हसीचा सन्मान केला जाईल.'

कृष्ण कुमार हे गुलशन कुमार यांचे छोटे भाऊ आहेत. ते टी सीरिजचे सह मालक आहेत. कृष्ण कुमार अभिनेता म्हणूनही चित्रपटात दिसले आहेत. ९०च्या दशकातील चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. 'बेवफा सनम' या सिनेमामुळे ते प्रसिद्धीझोतात आले. या सिनेमातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. लकी : नो टाइम फॉर लव्ह, रेडी, डार्लिंग, एअरलिफ्ट, सत्यमेव जयते या सिनेमांची त्यांनी निर्मिती केली होती. तिशा कृष्ण कुमार यांच्याबरोबर अनेक इव्हेंटला हजेरी लावायची. 'अॅनिमल' सिनेमाच्या सक्सेस पार्टीतही ती दिसली होती.

krishan kumar daughter death
Navara Maza Navsacha 2: प्रेक्षकांचा लाडका एसटी कंडक्टर झाला टीसी; 'नवरा माझा नवसाचा २' मधील अशोक मामांचा लूक समोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.