Bharat Jadhav: काही दिवसांपूर्वी इथेच... केशव भोसले नाट्यगृहातील अग्नितांडव पाहून भरत जाधव भावुक; फोटो शेअर करत म्हणाले

Bharat Jadhav On Keshavrao Bhosale Theater Fire: संगीत सूर्य केशव भोसले नाट्यगृहाला लागलेली आग पाहून भरत जाधव यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
bharat jadhav
bharat jadhavesakal
Updated on

कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीत सूर्य केशव भोसले नाट्यगृहाला काल रात्री ८ ऑगस्ट २०२४ रोजी भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झालं. कोल्हापुरातील या ऐतिहासिक वास्तूची मोठी हानी झाली. इतकं मोठं नाट्यगृह असं जळताना पाहणं हे सगळ्यांसाठीच धक्कादायक होतं. ही बातमी समजताच कलाप्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यावर अनेक कलाकारांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. आता अभिनेते भरत जाधव यांनीही एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या आहेत.

भरत जाधव यांनी नाट्यगृहाचा एक फोटो शेअर करत म्हटलं, 'अतिशय दुःखद घटना... संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे माझ्या सर्वात आवडत्या नाट्य गृहांपैकी एक. नुकत्याच माझ्या "अस्तित्व" या नाटकाला "महाराष्ट्र राज्य मराठी व्यवसायिक नाट्य स्पर्धेची" भरपूर बक्षिसे मिळाली. या नाटकाची रंगीत तालीम मी याच नाट्यगृहांमध्ये काही महिन्यांपूर्वी केली होती. नाट्यगृह जळणे ही घटना अत्यंत क्लेशदायक व मनाला चटका लावून जाणारी आहे. आज पर्यंतच्या या नाट्यगृहाच्या आठवणी हृदयाच्या कोपऱ्यात चिरंतर राहतील.' त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या नाट्यगृहामध्ये अनेक नाटकांचे प्रयोग दररोज होत होते. एक काळ या नाट्यगृहाने पाहिला. आता या नाट्यगृहाची हानी पाहून अनेक कलाकार भावुक झाले आहेत. अभिनेत्री सोनाली पाटील हिला देखील नाट्यगृहाची अवस्था पाहून रडू कोसळलं. ज्या रंगभूमीवरती आणि रंगमंचावरती उभा राहिलो. आमची नाटकं एवढी झाली. ती गोष्ट, आमचं सगळ्यात मोठं घर किंवा आमचं वैभव जे आहे ते पूर्ण खाक झालं आहे. हीच गोष्ट सगळ्यांना मला सांगायची होती की, मला माहिती नाहीये पुन्हा ते उभं राहिलं तर कसं उभं राहील. असं म्हणता तिने व्हिडिओ शेअर केला होता.

bharat jadhav
Bigg Boss Marathi 5: गेम नाही कळला पण माणसं कळली! सुरजला कचरा काढताना पाहून अंकिता, पॅडी भावुक, म्हणतात-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.