Bharat Jadhav Wife: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते भरत जाधव यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. चित्रपट असो वा नाटक त्यांनी नेहमीच आपल्या दर्जेदार अभिनयाने सगळ्यांच्या मनावर राज्य केलं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट आणि नाटकात काम केलं. आज ते मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. मात्र या सगळ्या यशात आपल्यापेक्षा जास्त आपल्या पत्नीचा वाटा आहे असं ते म्हणाले आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी माझी पत्नी नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असते असं सांगत त्यांनी पत्नीचं कौतुक केलं आहे.
भरत यांनी नुकतीच सकाळला मुलाखत दिली या मुलाखतीत ते म्हणाले, 'माझी बायको सरिता, खूप छान पद्धतीने घर सांभाळते. माझ्या आई वडिलांनादेखील तिने छान सांभाळलं. आता आई- वडील नाहीयेत पण माझ्या संपूर्ण कुटुंबाला तिने छान जपलंय. छान लक्ष असतं तिचं. मुलांना तिने वाढवलंय. मुलांकडे तिने लक्ष दिलं त्यामुळे माझी मुलं आज चांगली कामं करतायत. माझी मुलगी आज डॉक्टर आहे. आता एम डीसाठी तयारी करतेय. मुलगा पदवी पूर्ण करून आता युपीएससीची तयारी करतोय. ती घरची बाजू भक्कम असल्यामुळे मी या इतर गोष्टी करू शकतो. आणि ताकदीने, ती ऊर्जा इथून मिळते आपल्याला.'
ते पुढे म्हणाले, 'जेव्हा एक बाजू आपली चांगली राहते तेव्हा टेंशन राहत नाही, चला. घरी आहे कुणीतरी बघणारं. आता मी बिनधास्त डेअरिंग करू शकतो. हे करूया ते करूया. आणि मी तिला विचारतो, असं सिरीयस नाटक जरी असलं तरी करू का? ती कधी नाही म्हणतच नाही. ती म्हणते, तुम्हाला योग्य वाटतंय तर तुम्ही करा. लोकांना कळेल की तुम्ही हा पण करू शकता.' असं म्हणत त्यांनी आपल्या पत्नीचं कौतुक केलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.