अभिनेता भाऊ कदमला 'चला हवा अभिनेता येऊ द्या' या कार्यक्रमाने चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली. या कार्यक्रमामुळे तो घरोघरी पोहोचला, मात्र हा कार्यक्रम बंद झाल्यामुळे तो इंडस्ट्रीतून गायब झाला की काय अशी चर्चा सुरू होती, मात्र आता तो पुन्हा परत येत आहे. या वेळी तो चित्रपट किंवा मालिकेतून परत येत आहे असे काही नाही, तर तो रंगभूमीवर पुन्हा काम करीत आहे. कॉमेडीचा हा शार्प शूटर 'सिरियल किलर' या नव्या नाटकामध्ये काम करीत आहे. अद्वैत थिएटर्स आणि सिंधू संकल्प एन्टरटेन्मेंट प्रा. लि. यांची प्रस्तुती असलेल्या या नाटकाची निर्मिती राहुल भंडारे आणि प्रणय तेली यांनी केली आहे. केदार देसाई हे या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक आहेत. हे धमाल नाटक शनिवारी (ता. १२) रंगभूमीवर दाखल होत आहे.
या नाटकामध्ये भाऊ कदमसह अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, श्रद्धा हांडे, तेजस पिंगुळकर हे कलाकारदेखील काम करीत आहेत. बेभान कॉमेडी आणि निखळ आनंदासोबतच भन्नाट ट्यूनिंगची ट्रीट देणारं हे नाटक प्रेक्षकांना निखळ आनंद देईल', असा विश्वास अभिनेते भाऊ कदम व्यक्त करतात. मालिका अभिनेत्री आणि रिपोर्टर यांच्यामध्ये घडलेल्या घटनेने संशयाचे सुरुंग पेरले जातात. या घटनेनंतर 'सिरियल किलर' म्हणून आलेला खरंच 'सिरियल किलर' असतो की नसतो ? याचा धमाल खेळ रंगतो. फुल टू कॉमेडीच्या रॅपरमध्ये गुंडाळून आलेला 'सिरियल किलर' काय धमाल उडवतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.
‘बेभान कॉमेडी आणि निखळ आनंदासोबतच आमच्या सगळ्यांच्या भन्नाट ट्यूनिंगची ट्रीट देणारं 'सिरियल किलर’ हे नाटक प्रेक्षकांना निखळ आनंद देईल’ असा विश्वास अभिनेते भाऊ कदम व्यक्त करतात. ‘नाट्यरसिकांना नेहमी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न अद्वैत थिएटर्सने केला आहे. ‘सिरियल किलर’ च्या माध्यमातूनही आम्ही सस्पेंस धमाल अशी नाट्यकृती आणली असून भाऊ कदमच्या चाहत्यांसाठी हे नाटक मनोरंजनाची दिलखुलास पर्वणी असणार आहे’. नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे तर संगीत विजय गवंडे यांचे आहे. प्रकाशयोजना श्याम चव्हाण यांची आहे. सूत्रधार सुनील पानकर गोट्या सावंत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.