आपण सगळ्यांनी लहानपणी ससा आणि कासवाची गोष्ट तर नक्कीच वाचली असेल. असंच काहीसं चित्र आता बॉक्स ऑफिसवर दिसतंय. ऐन दिवाळीत प्रदर्शित झालेल्या 'भूल भुलैया ३' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. या दिवाळीत कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया ३' सोबत अजय देवगन याचा 'सिंघम अगेन'देखील प्रदर्शित झालाय. या दोन्ही चित्रपटांमध्ये सध्या ससा कासवाची स्पर्धा सुरू आहे. या रेसमध्ये कोण पुढे जाणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. मात्र आता दुसऱ्या वीकेंडला 'भूल भुलैया ३'ने थेट ३०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री मारली आहे. या आठवड्यात 'भूल भुलैया ३'ने सिंघम अगेन'पेक्षा जास्त कमाई करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिलाय.
गेल्या बुधवारपासून 'भूल भुलैया 2' देशात 'सिंघम अगेन'च्या पुढे होता. मात्र रविवारी या चित्रपटाने अजय देवगणच्या चित्रपटापेक्षा 3.25 कोटींची कमाई केली. हा वीकेंड गेम चेंजर ठरला आहे, कारण 'सिंघम अगेन'ने शुक्रवार ते रविवारपर्यंत 33.50 कोटींचा व्यवसाय केला आहे, तर 'भूल भुलैया 3' ने तब्बल 41.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
sacnilk च्या रिपोर्टनुसार, रविवारी रिलीजच्या 10 व्या दिवशी, कार्तिक आर्यन, विद्या बालन, तृप्ती डिमरी आणि माधुरी दीक्षित अभिनीत चित्रपटाने 16.50 कोटींचा व्यवसाय केला आहे. एका दिवसापूर्वी शनिवारी याने 15.50 कोटींची कमाई केली होती. अशाप्रकारे 10 दिवसांत देशात 199.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
विशेष म्हणजे, या हॉरर-कॉमेडीने 'भूल भुलैया 2' ची 184.32 कोटी रुपयांची आयुष्यभराची कमाई मागे टाकली आहे. इतकेच नाही तर 150 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'भूल भुलैया 3'ने आता 49.50 कोटींचा नफा कमावला असून तो सुपरहिट ठरला आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैया 3' ची कमाई आता 'सिंघम अगेन' पेक्षा फक्त 7 कोटी रुपये मागे आहे. मात्र जगभरातील कमाईमध्ये मोठा बदल झाला आहे.
'भूल भुलैया 3' ने जगभरातील कमाईत 'सिंघम अगेन'ला मागे टाकले असून 2.60 कोटी जास्त कमावलेत. या हॉरर कॉमेडीने जागतिक बॉक्स ऑफिसवर 10 दिवसांत 315.40 कोटी रुपयांचे कमाई केली आहे. यापैकी 76 कोटी रुपयांची एकूण कमाई परदेशात झाली आहे. तर 'सिंघम अगेन'ने 10 दिवसांत जगभरात 312.80 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुले 'भूल भुलैया ३' ची कमाई ही सिंघम अगेनपेक्षा जास्त आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.