Bigg Boss 18 Eviction : नो गेम नो फेम, दुसऱ्याच आठवड्यात 'बिग बॉस १८'च्या घरातून बाहेर झाला 'हा' सदस्य

Bigg Boss 18 Elimination : 'बिग बॉस १८'ची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. या आठवड्यात आणखी एक सदस्य घराबाहेर झाला आहे.
bigg boss 18 eviction
bigg boss 18 eviction esakal
Updated on

'बिग बॉस १८' मधील या आठवड्यातील विकेंडचा वार खूप धमाकेदार असणार आहे. जिथे सलमान एकीकडे घरातल्यांना फटकारताना दिसणार आहे. तिथे 'लाफ्टर शेफ्स' मधील काही स्पर्धक घरातल्यांना हसवण्यासाठी सज्ज असणार आहेत. मात्र या आठवड्यात घरातलं पहिलं एव्हिक्शन पार पडणार आहे. सध्या एका सदस्याचं नाव सोशल मीडियाला व्हायरल होतंय जो या आठवड्यात घराबाहेर जाणार आहे. कोण आहे तो सदस्य?

'बिग बॉस सीझन 18' मध्ये या आठवड्यात एकूण 10 सदस्यांना नॉमिनेट करण्यात आलं होतं. ज्यात एलिस कौशिक आणि अविनाश मिश्रा व्यतिरिक्त रजत दलाल, तजिंदर बग्गा, श्रुतिका अर्जुन, हेमा शर्मा, शिल्पा शिरोडकर, चाहत पांजे, करणवीर मेहरा आणि मुस्कान बामणे यांचा समावेश होता. या आठवड्यात घरातील सगळेच सदस्य चांगले वागताना दिसले. परंतु, या आठवड्यात एकाच पत्ता कट होणार आहे.

हेमा शर्मा 'बिग बॉस 18'मधून बाहेर

यापूर्वी गुणरत्न सदावर्ते घराबाहेर झाले होते मात्र ते एलिमिनेट होऊन बाहेर गेले नव्हते तर त्यांना न्यायालयाच्या आदेशामुळे बाहेर जावं लागलं होतं. 'बिग बॉस'च्या फॅन पेजेसच्या रिपोर्टनुसार, हेमा शर्माला बाहेर काढण्यात आलं आहे. आणि ती बाहेर पडणारी घरातली पहिली स्पर्धक बनली आहे. या आठवड्यात मुस्कान घरभर होऊ शकते असं सगळ्यांना वाटत होतं मात्र 'व्हायरल भाभी' जास्त कंटेंट देऊ शकली नाही आणि पुढच्याच आठवड्यात तिला घरबाहेर जावं लागलं. ती जोपर्यंत तुरुंगात होती तेव्हा तिचा गेम स्ट्रॉंग होता मात्र बाहेर येताच ती कॅमेरावरून गायब झाली. आता अखेर तिला बाहेरचा रस्ता धरावा लागला आहे.

या आठवड्यात वीकेंडच्या वारमध्ये सलमान शिल्पा शिरोडकरला प्रोत्साहन देणार आहे. तर अविनाश मिश्रा आणि अरफिन यांना चांगलंच सुनावणार आहे.

bigg boss 18 eviction
अख्ख कुटुंब खोटारडं आहे! सलीम खान यांना बिष्णोई महासभेचं सडेतोड उत्तर; म्हणाले- तुमचा मुलगा ३ महिने जेलमध्ये होता हे...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.