Entertainment News: छोटी पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री 'बिग बॉस' फेम श्रीजिता डे गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिने असं काहीतरी केलंय ज्यामुळे तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. श्रीजिताने १० नोव्हेंबर २०२४ रोजी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. ती पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकली आहे. आता ती बंगाली पद्धतीने विवाहबंधनात अडकली आहे. मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे तिने तिच्या पतीसोबतच पुन्हा लग्न केलं आहे. तिने तिचा पती ब्लोम- पेपशी लग्नगाठ बांधलीये. या लग्नाची आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
श्रीजिता डेने तिचा बॉयफ्रेंड ब्लोम-पेपशी लग्न केलं आहे. श्रीजिताने आपल्या मेंहदी आणि हळदीच्या कार्यक्रमाचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत. त्यांचा हा लग्नसोहळा गोव्यात पार पडला. श्रीजिता आणि ब्लोम-पेप यांनी यापूर्वी ३० जून २०२३ ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं होतं. तेव्हा त्यांनी आठ महिन्यांनंतर लग्नाचं रिसेप्शन केलं होतं. आता त्यांनी पुन्हा एकदा बंगाली पद्धतीने लग्न केलंय. २०१९ पासून श्रीजिता आणि मायकल एकमेकांना डेट करत होते. मायकलने श्रीजिताला पॅरिसमध्ये असताना आपल प्रेम व्यक्त केलं होते. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. आता या लग्नातील तिच्या प्रत्येक लूकची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे.
श्रीजिताने हळदीसाठी व्हाईट पेस्टल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. त्यावर पिवळ्या रंगाची ओढणी घेतली होती. तर ब्लोम-पेपने व्हाईट पेस्टल रंगाची शेरवानी परिधान केली होती. श्रीजिता तिच्या हळदी सोहळ्याला एक हटके कॅप्शन दिलं होतं. तिने लिहिलं की, "दिल से दिल तक… प्रेमाचा आणि आनंदाचा रंग !' आता अखेर त्यांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला आहे. चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.