Bigg Boss: लोकप्रिय भारतीय रेसलर द ग्रेट खली म्हणजेच दिलीप सिंह राणा याने 'बिग बॉस सीझन ४' मध्ये हजेरी लावली होती. खलीचा खेळ प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. तो या सीझनचा रनर अप ठरला होता. तो तब्बल ९७ दिवस घरात राहिला होता. या कार्यक्रमातून त्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्याच्या बलदंड शरीराच्या मागे एक प्रेमळ मन आहे हे बिग बॉसच्या घरात आलेल्या खलीने दाखवून दिलं. हा सीझन अभिनेत्री श्वेता तिवारी हिने जिंकला होता. मात्र आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खलीने बिग बॉस स्क्रिप्टेड असल्याचं सांगितलं आहे. सोबतच तो हा शो का जिंकू शकला नाही हेदेखील त्याने सांगितलं आहे.
बिग बॉस हे स्क्रिप्टेड असतं का, घरात नेमकं काय घडतं असे अनेक प्रश्न कायम प्रेक्षक विचारताना दिसतात. त्यावर अनेक कलाकार बिग बॉस स्क्रिप्टेड नसल्याचं सांगतात. मात्र आता ग्रेट खलीने याबाबतीत एक मोठा खुलासा केला आहे. 'सरदार टेक' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत खलीला विचारण्यात आलं की तुला बिग बॉस न जिंकू शकल्याचं वाईट वाटतं का? त्यावर उत्तर देताना खली म्हणाला, 'आपल्याल्या वाटतं की हा रोजचा खेळ आहे. तुमच्या नजरेने पाहिला तर मी हरलो पण माझ्या दृष्टीने मी जिंकलोय. माझ्या दृष्टीने हा एक टीव्ही शो आहे. तुम्हाला केव्हा जिंकवलं जातं? जेव्हा तुमच्याकडून चॅनेलला भविष्यातही फायदा असतो.'
तो पुढे म्हणाला, 'कुणाला किती महत्व द्यायचं हे चॅनेल ठरवतं. कुणाला महत्व दिलं जातं जे उद्याही कामाला येणार आहेत. त्यांना माहितीये की खलीला तर WWE मध्ये जायचंय, मग ते मला महत्व का देतील? ते मला का जिंकवतील?' यानंतर खलीला बिग बॉस स्क्रिप्टेड असतो का असं विचारण्यात आलं. त्यावर खली म्हणाला, 'हो, सगळं स्क्रिप्टेड आहे. सगळं काही सांगितलं जातं. सगळे शो स्क्रिप्टेड असतात. WWE सुद्धा स्क्रिप्टेड असतं. सगळं आधीच ठरलेलं असतं.' खलीच्या या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, 'पहिल्यांदा बिग बॉसबद्दल कुणीतरी खरं बोललं आहे.' आणखी एकमे लिहिलं, 'भाई हे अनेकांना पटणार नाही पण हे खरं आहे.'
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.