BB Marathi Elimination: डीपीने सगळ्यांना टाकलं मागे; निकी-अरबाज नाही, याला मिळाली सगळ्यात कमी मतं; वाचा Voting trends

Bigg Boss Marathi 5 Voting Trends: सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. या आठवड्यात कोण होणार घराबाहेर हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
bigg boss marathi 5 elimination
bigg boss marathi 5 elimination esakal
Updated on

'बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन चांगलाच गाजतोय. या सीझनमध्ये प्रेक्षकही चांगलेच गुंतले आहेत. निक्कीचं वागणं असो, घरातील भांडणं असोत किंवा निक्की आणि अरबाज यांचं प्रेम असो नेटकरी सगळ्यावर आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. मात्र हा बिग बॉसचा खेळ आहे. यात दर आठवड्याला एक सदस्य घराबाहेर होणार आहे. या आठवड्यातही घराबाहेर जाण्यासाठी एक नॉमिनेशन टास्क खेळण्यात आला. यात आपल्याला घरात नको असलेले सदस्य रद्दीत टाकण्यात आले. यात घरातील एक दोन नाही तर एकूण सात सदस्य नॉमिनेट होते. आता यापैकी कुणाला जास्त वोट मिळालेत ते पाहूया.

'बिग बॉस मराठी ट्रोल्स या इंस्टाग्राम पेजने दिलेल्या माहितीनुसार या आठवड्यात सुरज चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पवार, निकी तांबोळी, अभिजित सावंत, अरबाज पटेल आणि घनश्याम दरोडे हे सात जण घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट आहेत. आता या सगळ्यांना नेमके किती वोट्स मिळाले आहेत हे जाणून घेऊया. या सात जणांपैकी सगळ्यात जास्त वोट मिळाले आहेत ते सुरज चव्हाण याला. सुरज नुकताच घराचा कॅप्टन झाला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आहे धनंजय पवार. तिसऱ्या क्रमांकावर आहे अभिजित सावंत.

त्यानंतर उरलेल्या चार सदस्यांपैकी सगळ्यात जास्त वोट्स मिळवून आर्या जाधव चौथ्या क्रमांकावर आहे. तर या आठवड्यात निकी आणि अरबाज यांना सगळ्यात कमी वोट मिळतील असा अंदाज लावला जात होता मात्र तसं घडताना दिसत नाहीये. निक्की जास्त वोटसह पाचव्या क्रमांकावर आहे तर तिच्या मागे अरबाज सहाव्या क्रमांकावर आहे. तर तर सगळ्यात कमी वोट मिळवून सातव्या क्रमांकावर आहे घनश्याम दरोडे. त्यामुळे घनश्याम या आठवड्यात घराबाहेर होण्याची पूर्ण शक्यता आहे. तर दुसरीकडे आता रितेश निक्कीला तिच्या वागण्याची शिक्षा देणार आहे. यापुढे निक्की कधीही घराची कॅप्टन होऊ शकणार नाही.

bigg boss marathi 5 elimination
२० वर्षांचा प्रवास थांबणार! 'होम मिनिस्टर' घेणार प्रेक्षकांचा निरोप; बांदेकर भावुक होत म्हणाले-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.