Bigg Boss Marathi 5 Voting Trends: निकी नाही तर 'हा' सदस्य होणार घराबाहेर? पुन्हा बदलले वोटिंग ट्रेंड्स

Bigg Boss Marathi Season 5 Latest Update: लोकप्रिय मराठी कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' मधून घरातून एक सदस्य आज घराबाहेर होणार आहे.
bigg boss marathi 5
bigg boss marathi 5esakal
Updated on

Bigg Boss Marathi 5 Eviction: लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' मध्ये दररोज नवीन काहीतरी पाहायला मिळतंय. त्यात घरातील सदस्य दररोज नवीन काहीतरी राडा करतायत. घरातल्या दोन ग्रुपमध्ये वाद पाहायला मिळतायत. आता कुठे घरातल्या काही सदस्यांना खेळ समजू लागला आहे. मात्र काही सदस्य अजूनही मागे आहे. तर काही एकमेकांच्या मागे लपून वार करतायत. मात्र हा एक खेळ आहे. त्यामुळे यातून दर आठवड्याला घरातून एक सदस्य बाहेर जाणार आहे. आता या आठवड्यात तिथे कुणाचा नंबर लागतोय हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्यात आता वोटिंग ट्रेंड्सदेखील वरखाली झाले आहेत. वाचा कोण आहेत बॉटम २.

या आठवड्यात सुरज चव्हाण, निकी तांबोळी, योगिता चव्हाण, पॅडी कांबळे, घनश्याम दरोडे, आणि निखिल दामले हे घरातील सदस्य नॉमिनेट झाले होते. मात्र यातील सूरज आणि योगिताला चाहत्यांचा फुल सपोर्ट आहे. सुरज याही आठवड्यात पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजे तो बाहेर जाण्यापासून सेफ आहे. त्यानंतर निकी आहे. तर तिसऱ्या स्थानावर योगिता आहे. या दोघीही बाहेर जाण्यापासून सेफ आहेत. चौथ्या स्थानावर पंढरीनाथ आहेत. तर शेवटच्या दोन स्थानांवर घनश्याम दरोडे आणि निखिल दामले आहेत. त्यातील घनश्यामचे वोट काल वाढले आहेत. त्यामुळे निखिल अगदी तळाला आहे.

यापिर्वी रितेशने निखिलला डबल ढोलकी म्हटलं होतं. तर या आठवड्यातही त्याला रितेशचा ओरडा पडला आहे. त्याचा खेळ मुळीच चांगला नसल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सध्याच्या वोटिंग ट्रेंड्सनुसार घरातून या आठवड्यात निखिल बाहेर जाऊ शकतो अशी शक्यता आहे. निखिलने 'रमा राघव' या मालिकेतून आपली ओळख निर्माण केली होती. आता तो खर्च घराबाहेर जाणार का हे पाहण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत.

bigg boss marathi 5
Bigg Boss Marathi: मला इथे नाही राहायचं! रडतच अभिनेत्रीने व्यक्त केली घरातून बाहेर जाण्याची इच्छा, रितेशने काय निर्णय घेतला?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.