दुसऱ्यांच्या मुलीही इथे मार खायला आलेल्या नाहीत... इंस्टावर लाइव्ह येत आर्याने काढली सगळ्यांची खरडपट्टी

Bigg Boss Marathi 5 Fame Aarya Jadhav First Insta Live: 'बिग बॉस मराठी ५' मधून बाहेर पडद्यावर आर्या जाधवने इंस्टाग्रामवर लाइव्ह येत सगळ्यांना सुनावलं आहे.
aarya jadhav
aarya jadhav esakal
Updated on

'बिग बॉस मराठी ५'चा मागचा आठवडा अतिशय रंजक होता. वाईल्ड कार्ड एंट्री आणि यानंतर घरात टास्क खेळताना झालेला गोंधळ. त्यात निक्कीला अडवताना आर्याने तिला कानशिलात लगावली. या नंतर आर्याने तिची चूक मान्य केली आणि बिग बॉसने तिला घराबाहेर जाण्याची शिक्षा सुनावली. त्यानंतर आता घराबाहेर आल्यावर आर्या पहिल्यांदाच लाइव्ह आली. तिने चाहत्यांसोबत गप्पाही मारल्या. त्यात तिने घरात नेमकं काय घडलं होतं हे सांगितलं. सोबतच निक्कीच्या आईला देखील त्यांच्या व्हिडिओवर थेट उत्तर दिलं आहे.

मी निक्की नाही

इंस्टाग्रामवर लाइव्ह येत आर्या म्हणाली, 'मी वॉशरुममध्ये होते. निक्कीला अडवण्याचं काम आर्या करेल असा प्लॅन होता. निक्कीचे हात पकडल्यानंतर तिने बिग बॉस ही टच करतेय असं म्हणत ओरडायला सुरुवात केली. निक्कीला गेम खेळता येत नाही. तिला फक्त बोलता येतं. जेव्हा ती वॉशरुममध्ये आली. तेव्हा मी अंकिताला म्हणाले की मी वॉशरुमचा दरवाजा बंद करून घेते. कारण अरबाज वगैरे बिझी होते. आजपर्यंत मी गेममध्ये समोरुन कधीच हिंसक झालेले नाही. निक्कीला मी मारल्याने तुम्ही मला सपोर्ट केलं हे बरोबर आहे. पण, मला वाटतं नाही की हे माझ्याकडून व्हायला पाहिजे होते. कारण, मी निक्की नाहीये.'

दुसऱ्यांच्या मुलीही मार खायला आलेल्या नाहीत

ती पुढे म्हणाली, 'पहिल्याच आठवड्यात निक्कीची नखं माझ्या गालावर लागलं होतं. तेव्हा काहीतरी होईल असं मला वाटलं होतं. नंतरही निक्कीच्या कॅप्टन्सीमध्ये मी तिला त्रास दिला. तेव्हा बेडरुममध्ये अंथरुण फेकत असताना जान्हवीने मला खेचलं. तेव्हा निक्कीने मला लाथ मारली. तिची आई म्हणते की माझी मुलगी मार खायला आलीये का? मला त्यांना सांगावसं वाटतं की काकू, तुमची मुलगी मार खायला आलेली नाही. पण दुसऱ्यांच्या मुलीही मार खायला इथे आलेल्या नाहीत.'

आर्या म्हणाली, ' मला जेव्हा सांगितलं की घराच्या बाहेर जा...तेव्हा मी काहीच बोलले नाही. कारण, माझ्याकडून चूक घडली होती. मी त्यांच्या निर्णयाचा आदर केला. तिथे मी बोलायला हवं होतं की नाही हे मला माहीत नाही. पण, याचा अर्थ निक्की बरोबर आहे असं नाही. पण, तेव्हा कोणी काहीच बोललं नाही. जे झालं ते झालं तुमचा सपोर्ट मला महत्त्वाचा आहे.'

aarya jadhav
मराठवाड्यातील हनुमंतच्या आयुष्यावर आधारित आहे प्रियांका चोप्राचा 'पाणी'; भेटा प्रेमासाठी काहीही करणाऱ्या हिरोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.