jahnavi killekar: काय सांगता! आठ वर्षाच्या मुलाची आई आहे बिग बॉस मराठीच्या घरातील जान्हवी किल्लेकर; पाहा तिच्या कुटुंबाचे फोटो

Jahnavi Killekar Family Photos: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिचं लग्न झालं असून तिला आठ वर्षाचा मुलगाही आहे.
jahnavi killekar kiran killekar
jahnavi killekar kiran killekar esakal
Updated on

Jahnavi Killekar Husband: 'भाग्य दिले तू मला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आज बिग बॉस मराठी ५' च्या घरात दिसतेय. तिने घरात जाताच अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. कॉलर्स मराठीने नुकताच प्रदर्शित केलेल्या प्रोमोमध्ये जान्हवी रॅपर आर्याशी भांडताना दिसतेय. ती फक्त भांडत नाहीये तर त्यांच्यात हाणामारी होतेय असं दिसतंय. त्यामुळे पुन्हा एकदा जान्हवी सोशल मीडियावर चर्चेत आहेत. तिच्यावर नेटकरी नाराज आहेत. मात्र सुंदर आणि फिट असणारी जान्हवी ही एका मुलाची आई आहे असं म्हटलं तर अनेकांना विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. जान्हवीचं लग्न झालं असून तिला आठ वर्षाचा मुलगा आहे.

जान्हवी सोशल मीडियावर सक्रीय असते. तिच्या चाहत्यांची संख्याही प्रचंड आहे. ती तिचे हॉट फोटोही चाहत्यांसोबत शेअर करत असते. ती नेहमीच आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करताना दिसते. बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी ती 'भाग्य दिले तू मला मालिकेत' सानियाच्या भूमिकेत दिसली होती. तिची ही भूमिकांचांगलीच गाजली. मात्र जान्हवीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक जणांना ठाऊक नाहीयेत. बिग बॉस मराठीमध्ये गोंधळ घालणाऱ्या जान्हवीने २०१३ साली लग्नगाठ बांधली तिच्या पतीचं नाव किरण किल्लेकर असं आहे. तर तिला आठ वर्षाचा मुलगा आहे. तिच्या मुलाचं नाव ईशान किल्लेकर आहे. जान्हवी सोशल मीडियावर तिच्या मुलासोबतचे अनेक फोटो शेअर करत असते.

जान्हवीने यापूर्वी 'आई माझी काळुबाई', 'राधा प्रेम रंगी रंगली', 'दिल दोस्ती दुनियादारी' तसंच 'फुलपाखरू' सारख्या लोकप्रिय मालिकांमध्येही काम केलं आहे. मात्र तिला 'कोलीवाडा झिंगला' या म्युझिक अल्बमधून खरी लोकप्रियता मिळाली. जान्हवी मुलाचे फोटो शेअर करत असली तरी ती ती तिच्या कुटुंबाबद्दल फारसं बोलताना दिसत नाही. आता जान्हवी बिग बॉसच्या घरात काय कल्ला करतेय हेपाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

jahnavi killekar kiran killekar
असा नवरा हवा गं बाई! जुई गडकरी लग्नासाठी तयार; पण मुलासाठी आहेत दोन महत्वाच्या अटी, म्हणते- त्याने नेहमी...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.