Rakshabandhan: ज्याला लहानपणापासून जपलं त्यालाच मरताना पाहिलं; निकी तांबोळीने गमावलाय सख्खा भाऊ

Nikki Tamboli Lost Her Brother: लोकप्रिय हिंदी अभिनेत्री निकी तांबोळी हिने आपल्या भावाला हळूहळू मृत्यूच्या जवळ जाताना पाहिलंय.
niki tamboli
niki tamboli esakal
Updated on

'बिग बॉस मराठी ५'च्या घरात सध्या टीम ए धुमाकूळ घालतेय. या टीममधील सगळ्यात चर्चेत असलेली व्यक्ती म्हणजे निकी तांबोळी. निकीने आपल्या वागण्याने सगळं घर डोक्यावर घेतलं आहे. मूळची डोंबिवलीकर असणारी निकी ही बाई म्हणत प्रेक्षकांच्या मनात आता स्थान मिळवताना दिसतेय. पहिल्याच आठवड्यात राडा करणारी ती आयता नरमली आहे. निकीचे सोशल मीडियावर प्रचंड फॉलोवर्स आहेत. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. मात्र अडचणी कुणालाच चुकलेल्या नाहीत. निकीनेदेखील तिच्या आयुष्यात काही वाईट दिवसांचा सामना केला आहे. तिने तिच्या सख्ख्या भावाला गमावलं आहे. आज रक्षाबंधनाच्या दिवशी तिला तिच्या भावाची कमी नक्की भासत असेल.

नेमकं काय घडलं होतं?

निकीच्या भावाचं नाव होतं जतिन तांबोळी. तो २९ वर्षाचा होता. लहानपणापासून निकीचा आपल्या लहान भावावर प्रचंड जीव होता. ती नेहमीच तिचे आणि भावाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायची. आपल्या भावाच्या निधनाची बातमीदेखील स्वतः निकीने चाहत्यांना दिली होती. जतिनला क्षयरोगाचं निदान झालं होतं. त्याला झालेल्या या आजाराने तो आधीच खचला होता. मात्र २०२० मध्ये आलेल्या करोनाच्या लाटेत त्याला करोनाची लागण झाली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. जेव्हा निकी बिग बॉस हिंदीमध्ये होती तेव्हाच तिने सोशल मीडियावर आपल्या भावाच्या तब्येतीबद्दल सांगितलं होतं. सोबतच आपल्या भावाच्या तब्येतीसाठी प्रार्थना करण्याचं आवाहनही केलं होतं.

मात्र निकीच्या भावाचं अखेर निधन झालं. तिने मे २०२४ मध्ये एक पोस्ट करत पुन्हा एकदा भावाच्या आठवणींना उजाळा दिला होता. तू माझ्यासोबत नाहीयेस यावर विश्वास बसत नाही. तू आकाशातला सगळ्यात जास्त चमकणारा तारा आहेस. आता तीन वर्ष झाली पण तू माझ्यासोबत आहेस असंच वाटत असं तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. आज रक्षाबंधनाच्या दिवशी पुन्हा एकदा निकीचे डोळे भावाच्या आठवणीने डबडबले नाहीत तरच नवल.

niki tamboli
Rakshabandhan 2024: वेड्या बहिणीची वेडी माया! रक्षाबंधनाला बहिणींनाच राखी बांधतात या लोकप्रिय अभिनेत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.