गेली कित्येक दिवस प्रेक्षक ज्या गोष्टीची वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे. लोकप्रिय रीलस्टार गुलिगत धोका फेम सूरज चव्हाण याने ''बिग बॉस मराठी ५'' ची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. त्याच्यावर प्रेक्षक शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
अभिजीत सावंत आणि सुरज चव्हाण यांच्यात आता ट्रॉफीसाठीची लढत रंगणार आहेत. हे दोघे बिग बॉस मराठी ५' चे टॉप २ ठरले आहेत.
'बिग बॉस मराठी ५' मधून निक्की तांबोळी आज घराबाहेर झाली आहे. तिचा हा प्रवास संपला आहे.
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने बिग बॉस मराठी ५' च्या मंचावर हजेरी लावली आहे. तिने मराठीत बोलत रितेशचं कौतुकही केलं आहे.
आता 'बिग बॉस मराठी ५' ला त्यांचे टॉप ३ स्पर्धक मिळाले आहेत. सुरज चव्हाण, अभिजीत सावंत, निकी तांबोळी हे तीन स्पर्धक बिग बॉसचे टॉप ३ स्पर्धक ठरले आहेत.
लोकप्रिय रीलस्टार धनंजय पोवार यांचा 'बिग बॉस मराठी ५' मधला प्रवास आता संपला आहे. धनंजय आता घराबाहेर झाले आहेत. धनंजय चौथ्या क्रमांकावर घराबाहेर झाले आहेत.
अंकिता वालावलकर 'बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमधून बाहेर झाली आहे. ती पाचव्या क्रमांकावर बाहेर पडली आहे. प्रचंड वोटिंग असताना देखील ती घराबाहेर झाल्याने आता नेटकरी नाराज झाले असून बिग बॉसच्या निर्णयावर शंका उपस्थित करत आहेत.
सुरज चव्हाण, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवार हे स्पर्धक या सीझनचे टॉप ५ स्पर्धक ठरले आहेत.
जान्हवी थेट ग्रँड फिनालेमध्ये येऊन पोहोचली. मात्र ग्रँड फिनालेमध्ये आता जान्हवीने पैशांची बॅग घेऊन घराबाहेर जाणं पसंत केलं. नऊ लाखांची रक्कम घेऊन जान्हवी घराबाहेर झाली आहे.
घरातील सहा स्पर्धकांना ९ लाखांची ऑफर देण्यात आली आहे.
अभिनेता सलमान खान याने रितेश देशमुख याच्या होस्टिंगचं कौतुक केलं आहे. रितेश भाऊ तू या कार्यक्रमात खूप गंमत आणली, असं म्हणत त्याने रितेशचं कौतुक केलं.
रितेशने ग्रँड प्रीमिअरला हजेरी तर लावली सोबतच गेले दोन आठवडे नसण्याचं कारण सांगितलं आहे. वर्षभरापूर्वी केलेल्या एका कमिटमेंटसाठी त्याला दोन आठवडे शूटिंगवर जावं लागलं. एका क्रूजवर ही शूटिंग असल्याने ती टाळता येणार नव्हती. त्यामुळे आपण इथे उपस्थित राहू शकल्याचं त्याने सांगितलं.
'बिग बॉस मराठी ५' च्या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली आहे. रितेश देशमुख याने ग्रँड फिनालेची धमाकेदार सुरुवात केली आहे.
गेले दोन आठवडे भाऊचा धक्का झाला नाही कारण रितेश देशमुख शूटिंगला अनुपस्थित होता. आता आज ग्रँड फिनालेला रितेश भाऊ दिसणार का असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.
'बिग बॉस मराठी ५' मध्ये नवनवीन ट्विस्ट येत आहेत. ग्रँड फिनालेची शूटिंग सुरू झाली आहे. त्यामुळे फॅन पेजेस चाहत्यांपर्यंत सगळ्यात आधी माहिती पोहोचवण्याचं काम करत आहेत. मात्र अशातच एक ट्वीट व्हायरल होतंय. ज्यात 'बिग बॉस मराठी ५'चे टॉप ३ स्पर्धक जाहीर करण्यात आले आहेत. यात पहिल्या क्रमांकावर आहे निक्की तांबोळी. दुसऱ्या क्रमांकावर आहे अभिजीत सावंत आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे सुरज चव्हाण. मात्र हे ट्वीट कितपत खरं आहे यावर नेटकरी शंका व्यक्त करत आहे.
'बिग बॉस मराठी ५' च्या शूटिंगला दुपारी ३ वाजताच सुरुवात झाली आहे. हे प्रक्षेपण ६ वाजता जिओ अँपवर पाहता येईल. मात्र शुटिंग सुरू झाल्याने फॅन पेजेस सगळ्यात आधी माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यानुसार निक्कीने टॉप ३ मध्ये स्थान मिळवलं असल्याची माहिती आहे.
'बिग बॉस मराठी ५' ची ट्रॉफी नेमकी कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अशातच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. निक्की टॉप ३ मध्ये असल्याचं बोललं जातंय. तर सुरज तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं बिग बॉसच्या फॅन पेजेसकडून सांगण्यात येतंय.
'बिग बॉस मराठी ५' च्या ग्रँड फिनालेमध्ये प्रेक्षकांना घराबाहेर झालेल्या वैभव आणि इरिना यांचा डान्स पाहायला मिळणार आहे.
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या वोटिंगबद्दल नवीन माहिती समोर येते आहे. 'बिग बॉस मराठी ५' च्या नव्या वोटिंग ट्रेंडनुसार निक्की तांबोळी हिने सूरजलादेखील मागे टाकलं आहे. वोटिंगच्या बाबतीत निक्की पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर सुरज आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर अभिजीत सावंत आहे.
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनच्या ग्रँड फिनालेला संध्याकाळी सहा वाजता सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वी वोटिंग ट्रेंडमध्ये बदल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ट्रेंडनुसार बिग बॉस मराठी सीजन 5 शेवटच्या दिवशी धक्कादायक वोटिंग झालं आहे. सूरज चव्हाणने त्याचा नंबर 1 राखून ठेवला आहे पण नंबर 2 वर आला आहे अभिजीत सावंत ज्याला काल तिसरं स्थान होतं तर पाचव्या स्थानावर असलेली निक्की आता तिसऱ्या स्थानावर आलीये आणि अंकिताला चौथ, धनंजय ला पाचवं आणि जान्हवीला सहावं स्थान मिळालं आहे.
आज ६ ऑक्टोबर रोजी 'बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. यात प्रत्येक स्पर्धकाचा हटके डान्स दाखवण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.