Bigg Boss Marathi 5: वर्षा यांच्याबद्दल जान्हवीच्या 'त्या' वक्तव्यावर उठली टीकेची झोड; अमृता धोंगडेचाही पारा चढला

Jahnavi Killedar Fight WIth Varsha Usgaonkar: अभिनेत्री जान्हवी किल्लेदारने पुन्हा एकदा वर्षा उसगावकर यांचा अपमान केल्याने आता सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे.
bigg boss marathi 5
bigg boss marathi 5esakal
Updated on

'बिग बॉस मराठी सीझन ५ मध्ये प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी घडताना दिसतंय. घरात जितकं चांगलं वातावरण असतं तितकीचं भांडणं देखील होतात. या सीझनला आता प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. इथे प्रत्येकजण आपलं महत्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. घरात सध्या दोन गट पडले आहेत. त्यात अनेकदा वाद होताना दिसतोय. मात्र त्यातही जान्हवी किल्लेदार ही घरातील प्रत्येकासोबत वाद घालताना दिसतेय. आता तिने वर्षा उसगावकर यांच्याशी घातलेल्या वादावर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. तिने वर्षा यांच्यासाठी वापरलेले शब्द ऐकून अनेकांनी तिला कार्यक्रमातून काढून टाकण्याची मागणी केली आहे.

या आठवड्यात जान्हवीने सुरज, अभिजीत, आर्या आणि आता वर्षा यांच्याशी वाद घातला आहे. जान्हवी आर्याला “निर्लज्ज…” म्हणत गार्डन परिसरातून जात असते. वर्षा पाठमोऱ्या बसलेल्या असल्याने त्यांना वाटतं नेहमीप्रमाणे जान्हवी त्यांच्याशी भांडण करते आहे. यानंतर जान्हवी त्यांचा गैरसमज दूर न करता वर्षा यांच्याशी भांडू लागते. ती म्हणते, 'ताई माझ्या नादी लागू नका… माझं तोंड खोलू नका. मी तुम्हाला आधीच सांगतेय… पहिल्या दिवसापासून मी तुमच्याशी आदराने बोलतेय.' यावर वर्षा म्हणतात, 'तू जे हसलीस… ते आदराने हसलीस का? उपहासाने…' यानंतर जान्हवी पुन्हा म्हणते, “तुमच्यासारखी मी खोटारडी नाहीये. मी चांगल्या हेतूने हसले, तुम्ही वेगळा अर्थ घेताय.'

वर्षा जान्हवीला म्हणतात, 'फालतू गोष्टींच्या नादी मी लागत नाही. इथे पोरं बसलीत म्हणून तुम्ही इथे येता.' यावर वर्षा तिला सांगतात, 'अगं पोरं काय म्हणतेस…मी माझ्या नवऱ्याबरोबर आनंदात आहे. हे किती गलिच्छ बोलणं आहे. ‘बिग बॉस’ तुमच्यापेक्षा मोठा आवाज या कळसूत्री बाहुलीचा आहे.' जान्हवी पुढे म्हणते, 'तुम्ही घाणेरडा अर्थ काढताय. ही घाणेरडी अ‍ॅक्टिंग माझ्यासमोर करू नका… हे घाणेरडं तोंड माझ्यासमोर दाखवूच नका ताई, ही फाल्तूची ओव्हरअ‍ॅक्टिंग नका करू, त्यांना आता पश्चाताप होत असेल यांना आपण पुरस्कार का दिले? कारण, बाहेर अनेक चांगले-चांगले अभिनेते आहेत. त्यांना पुरस्कार मिळाले नाहीत…पण, तुम्हाला दिलाय.' यावर 'बिग बॉस मराठी ४' फेम अमृता धोंगडेने राग व्यक्त करत जान्हवी रिस्पेक्ट घरी विसरून आलीये अशी टीका केली आहे.

bigg boss marathi 5
Bigg Boss Marathi 5: गेम नाही कळला पण माणसं कळली! सुरजला कचरा काढताना पाहून अंकिता, पॅडी भावुक, म्हणतात-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.