बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट! वोटिंग लाईन बंद तरीही अंकिता वालावलकर झाली घराबाहेर, नवा प्रोमो पाहून नेटकरी शॉक

Ankita Walawalkar Evicted From Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो पाहून सगळेच चकीत झाले आहेत. वोटिंग लाइन्स बंद असूनही अंकिता घराबाहेर झाली आहे.
bigg boss marathi 5
bigg boss marathi 5esakal
Updated on

'बिग बॉस मराठी ५' ची फॉलोविंग प्रचंड मोठी आहे. प्रेक्षक या कार्यक्रमावर भरभरून प्रेम करताना दिसतायत. आता या खेळाचा पाचवा आठवडा सुरू झाला आहे. खेळाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक आठवड्यात एक सदस्य घराबाहेर होतो. या आठवड्यात चार सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट होते. मात्र या आठवड्यात वोटिंग लाइन्स बंद होत्या. त्यामुळे या वीक मध्ये कुणीही घराबाहेर जाणार नाही असं वाटत होतं . मात्र इथेच घरात मोठा ट्विस्ट आला आहे. वोटिंग लाईन्स बंद असतानाही अंकिता वालावलकर घराबाहेर झाली आहे. कलर्सने नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमुळे सगळेच चकीत झाले आहेत.

या आठवड्यात घरात सगळेच जोडीने राहत होते. अरबाज-आर्या, पॅडी-घन:श्याम अशा जोड्या ‘बिग बॉस’कडून बनवण्यात आल्या होत्या. यावेळी घरात नॉमिनेशन कार्य सुद्धा जोडीनेच पार पडलं होतं. त्यात निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर आणि अंकिता वालावलकर हे चार सदस्य नॉमिनेट झाले होते. मात्र या आठवड्यात वोटिंग लाइन्स बंद होत्या. त्यामुळे या आठवड्यात कुणीही बाहेर जाणार नाही असं वाटत असतानाच कलर्स मराठीने एक नवा प्रोमो शेअर केला आहे. यात रितेश अंकिता तुमचा प्रवास आज इथेच संपलाय असं सांगतोय. रितेशने जाहीर केल्यावर डीपी, सूरज चव्हाण यांच्यासह अनेकांना अश्रू अनावर होतात. त्यामुळे अंकिताच्या एविक्शनबद्दल ऐकून सर्वांनाच धक्का बसतो.

‘बिग बॉस’ने माहिती दिल्याप्रमाणे अंकिता तिच्या नावाची पाटी घेऊन मुख्य प्रवेशद्वाराकडे येतेय. मुख्य द्वाराकडे सर्वांना शेवटचं गूडबाय म्हणत अंकिता घरची वाट धरणार असल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांसह अंकिताच्या चाहत्यांना याचा खूप मोठा धक्का बसला आहे. आता नेटकऱ्यांनी हा प्रोमो दिशाभूल करणारा असल्याचं सांगितलं आहे. तिला बाहेर न काढता तिला सिक्रेट रूममध्ये ठेवतील असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. यापूर्वीही आधीच्या सीझनमध्ये काही सदस्यांना असं सिक्रेट रूममध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे अंकितही सिक्रेट रूममध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र यामुळे टीम बीला मोठा धक्का बसला आहे हे मात्र नक्की.

bigg boss marathi 5
Jahnavi Killekar: पैसा पाहून भुलली असं... दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना जान्हवीच्या नवऱ्याचं सडेतोड उत्तर, म्हणाला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.