BB Marathi 5 : निक्कीचे चाहते वोटींगमध्ये लावतायत जोर, घराबाहेर होणार कोण? वाचा Opening Voting Trends

Bigg Boss Marathi 5 Voting Trends: लोकप्रिय मराठी कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' मध्ये आता सातव्या आठवड्याचं एलिमिनेशन होणार आहे.
bigg boss marathi 5
bigg boss marathi 5esakal
Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या आठवड्यात घरात अनेक गोष्टी घडल्या. त्यात छोटा पुढारी घनश्याम दरोडे याने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर घरात एका वाइल्ड कार्डची एंट्री झाली. कोल्हापूरचा बॉडीबिल्डर संग्राम चौगुले याने घरात एंट्री घेतली. त्यानंतर त्याने थेट अरबाज आणि निक्की यांच्यासोबत पंगा घेतला. त्यानंतर घरात या आठवड्याचं एलिमिनेशन पार पडलं. या आठवड्यात पुन्हा एकदा सहा स्पर्धक एलिमिनेट होण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. त्यातच आता आठवड्याची वोटिंग सुरू झाली आहे. पाहा आठवड्याच्या सुरुवातीला कोणता सदस्य कोणत्या स्थानावर आहे.

या आठवड्यात अंकिता वालावलकर, वैभव चव्हाण, निक्की तांबोळी, वर्षा उसगावकर, अभिजित सावंत आणि आर्या जाधव हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट आहेत. त्यात आता प्रत्येक सदस्याचे चाहते त्याला वाचवण्यासाठी जोर लावत आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला अंकिता वालावलकर ही वोटींगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर तिच्यापाठोपाठ अभिजीत सावंत आहे. तिसऱ्या क्रमांकावर रॅपर आर्या जाधव आहे. तर चौथ्या क्रमांकावर आहेत लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगावकर. त्यानंतर आहेत बॉटम २.

बॉटम २ मध्ये कोण ?

संपूर्ण महाराष्ट्र जरी निकी घराबाहेर जाण्याची वाट पाहत असला तरी तिचे चाहते मात्र तिला वाचवण्यासाठी जोर लावताना दिसत आहेत. ओपनिंग वोटिंग ट्रेंड्समध्ये निक्की पाचव्या स्थानावर आहे. तर अभिनेता वैभव चव्हाण याला सगळ्यात कमी मतं मिळाली आहे. आता पुढील ४ दिवसात हे वोटिंग ट्रेंड्स बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

bigg boss marathi 5
Malaika Arora Father: अनिल यांनी लेक मलायकालाच केलेला शेवटचा फोन; ते शेवटचे शब्द बोलून मारली गच्चीवरून उडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.