Bigg Boss Marathi 5 Update: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ''बिग बॉस मराठी ५' ( Bigg Boss Marathi ) ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. दररोज बिग बॉसच्या घरात नवीन घटना घडताना दिसतायत. नुकताच घरात छोट्या पाहुण्यांना सांभाळायचा टास्क पार पडला. त्यात टीम ए जिंकली. सगळ्यात आता आणखी एक वाद निर्माण झाला आहे. निकी आणि वर्षा उसगावकर यांच्यातील वाद आता नवीन नाहीत मात्र या टास्कदरम्यान निकी त्यांना असं काहीतरी बोलली ज्यामुळे प्रेक्षक प्रचंड रागावले आहेत. निकीने वर्षा यांच्या मातृत्वाबद्दल भाष्य केलं आहे. त्यावरून सोशल मीडियावर नाराजी आहे.
घरात टास्क सुरू असताना निक्कीने B टीमच्या सदस्यांच्या बाहुलीचा एक पाय तोडला. त्यामुळे वर्षा यांनी, निक्कीने बाहुलीची मुंडी काय, तंगडं तोडलं असं म्हटलं. यावर उत्तर देताना निक्की म्हणाली, यांच्या भावना बघितल्या का? आईचं प्रेम कसं समजेल जाऊ देत… एका आईचं प्रेम काय असतं तुम्हाला काय माहिती?अंकिता हे वाक्य ऐकताच प्रचंड भावुक झाली. ती रागात निक्कीला म्हणाली, ए…तुझं हे बोलणं अतिशय चुकीचं आहे. आताच बिग बॉस म्हणाले… हा मानवी भावनांचा खेळ आहे आणि मॅमना तू जे बोलतेय…ते सहन केलं जाणार नाही. त्यांच्या मातृत्त्वावर जाऊ नकोस. निक्की तू चुकीचं बोलतेस.'
अंकिता भडकल्यावर निक्की तिला म्हणते, हे तू मला सांगू नकोस. या स्वत: तंगडं तोडलं म्हणाल्या आणि मला भावनांबद्दल सांगतात. निक्कीचा हा अरेरावीपणा पाहून वर्षा यांनी म्हटलं, “तू जे केलंय तेच मी सांगितलं… शब्द हे बाणासारखे असतात आणि ते परत घेता येत नाहीत एवढं लक्षात ठेव निक्की, एकदा बाण गेला की गेला. यावर पॅडी म्हणतो, मुलांवरून गॉसिप करणं प्रचंड चुकीचं आहे. आज इंडस्ट्रीत यांच्याबद्दल कोणी चकार शब्दही काढत नाही.'
त्यानंतर निकी अरबाजला म्हणते की मला माहीत नव्हतं की त्यांना मुलं नाहीयेत. त्यावर अरबाज तिला त्यांची माफी मागायला सांगतो. ती सकाळी जाऊन वर्षा यांची माफी मागते. मी आईबद्दल जे काही बोलली त्यासाठी मनापासून सॉरी असं म्हणते. यावर, “तू बोललीस ते अक्षम्य आहे पण, ठिके” अशी प्रतिक्रिया वर्षा देतात. मात्र यावर नेटकरी प्रचंड भडकले आहेत.
एका युजरने प्रतिक्रिया देत लिहिलं, 'वर्षा उसगांवकर यांच्या मातृत्त्वाबद्दल बोललं गेलंय…हे लाइव्ह स्क्रीनवर बोलणं चुकीचं आहे.' दुसऱ्या युजरने लिहिलं, 'खूप फालतू खेळ आहे. या निक्कीला वर्षा ताईंच्या मातृत्त्वावर बोलण्याचा अधिकार कोणी दिला? आता निक्कीने हद्दपार केली आहे. हाकलून द्या निक्कीला… नंतर माफी मागून काहीच उपयोग नाही.' आणखी एका युजरने लिहिलं, 'स्वत: स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या मातृत्त्वावर बोलणं कितपत योग्य आहे? यांना लाज वाटली पाहिजे.' अशा संतप्त प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.