Bigg Boss Marathi 5: निक्कीने काढला बाप... भाऊच्या धक्क्यावर संतापला रितेश, दिली मोठी शिक्षा; म्हणाला- इथून पुढे तू...

Bigg Boss Marathi Season 5 Riteish Deshmukh Punished Nikki Tamboli: अभिनेता रितेश देशमुख याने भाऊच्या धक्क्यावर निक्कीला मोठी शिक्षा दिली आहे.
bigg boss marathi 5
bigg boss marathi 5esakal
Updated on

'बिग बॉस मराठी'चा सीझन वेगवेगळ्या कारणामुळे चांगलाच चर्चेत आहे. घरात होणारे वाद तर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होतेच सोबतच घरातले टास्कही प्रेक्षकांना आवडत आहेत. टीम ए आणि टीम बी मध्ये पडलेली फूट असेल किंवा घरात होणार प्रेमाचा आणि लढाईचा ड्रामा असेल सगळ्यावर प्रेक्षक बारीक लक्ष ठेवून आहेत. याप्रमाणेच प्रेक्षक वाट पाहत असतात ती भाऊच्या धक्क्याची. या आठवड्यातही निक्कीला शिक्षा होणार आहे. त्याचं कारण ठरलंय तिचं वागणं. तिचा मनमानी कारभार आता खपवून घेतला जाणार नाही असं म्हणत या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर रितेश निक्कीला मोठी शिक्षा देणार आहे.

निक्कीने या आठवड्यात घरातील कोणतंही काम करण्यास नकार दिला. किचनशिवाय कोणतंही काम आपण करणार नाही असं तिने सांगितलं. त्यानंतर सुरज कॅप्टन झाला मात्र सूरज कॅप्टन झाल्यावर अगदी पहिल्याच दिवशी चहा बनवण्यावरून आर्या आणि निक्कीमध्ये जोरदार भांडणं झालं. निक्कीने स्वत:साठी केलेल्या चहाची भांडी घासण्यास नकार दिला. निक्की आणि आर्यामध्ये झालेली या वादामध्ये निक्कीने आर्यावर आक्षेपार्ह टिपण्णी केली. त्यानंतर आर्याने प्रचंड संतापून “बाप काढायचा नाही…” असं म्हणाली. यावर रितेश काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं.

आता निक्कीच्या या वागण्यावर रितेश तिला जाब विचारणार आहे. कलर्स मराठीने भाऊच्या धक्क्याचा नवा प्रोमो प्रदर्शित केला आहे. त्यात रितेशला म्हणतो, 'निक्की तुम्ही घरात इतरांचा बाप काढलात.' यानंतर रितेश तिला मोठी शिक्षा सुनावतो. रितेशने निक्कीकडून तिची कॅप्टन्सी काढून घेतली आहे. रितेश म्हणतो, 'इथून पुढे तुम्ही कधीच या घराच्या कॅप्टन होऊ शकत नाही.' तर यासोबतच तो तिला दुसरी शिक्षाही देणार आहे. आता ही शिक्षा काय असणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तर काही प्रेक्षक तिला जेलमध्ये टाकण्याची मागणी करत आहेत.

bigg boss marathi 5
Bhushan Pradhan: मुलगा असावा तर असा! भूषण प्रधानने आई- वडिलांसाठी घेतलं नवं घर; म्हणाला- गेले सहा महिने मी...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.